रासायनिक रंग व वृक्षतोड करणाऱ्यांवर होणार कारवाई, होळी साजरी करणाऱ्यांनो सावधान!

वृक्ष तोडीत सहभागी व्यक्तीवर कलम 21 अंतर्गत एक हजार ते पाच हजार रुपये दंडात्मक कारवाई केली जाते.

रासायनिक रंग व वृक्षतोड करणाऱ्यांवर होणार कारवाई, होळी साजरी करणाऱ्यांनो सावधान!
SHARES

होळी आणि रंगपंचमी निमित्त बाजारात आता रासायनिक रंगांची उटाठेव वाढली आहे.मात्र बाजारात उपलब्ध असलेला रासायनिक गुलाल आणि रंग आरोग्यास अपायकारक ठरत असल्याने हे घातक रंगउधळू नये, असा सल्ला पर्यावरण तज्ज्ञांनी दिला आहे. तर मुंबई पोलिस आयुक्तांनी अशा रासायनिक गुलाल आणि रंगाची विक्री करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. तर होळीसाठी लागणाऱ्या लाकडांसाठी झाडांची तोड केल्यास तुम्हच्यावर महाराष्ट्र झाडे संरक्षण कायदा १९५१ अंतर्गत गुन्हा नोंदवला जाऊ शकतो. किंवा एक आठवडा तुम्हाला तुरूंगात जावे लागेल.

हेही वाचाः- PF चे व्याजदर घटले, 'हा' आहे नवीन दर

होळीच्या पार्श्‍वभूमिवर बेकायदेशिररित्या मोठ्याप्रमाणात वृक्ष व त्यांच्या फांद्यांची तोड होते. पूर्वी ज्या ठिकाणी असे प्रकार घडले आहेत. त्या ठिकाणी पोलिस बंदोबस्त ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विशेष करून पूर्व व पश्‍चिम द्रुतगती मार्गांशेजारी असलेल्या मोठ्या वृक्षांची तोड झाल्याचे यापूर्वी पाहण्यात आले आहे. त्यामुळे अशा ठिकाणी बंदोबस्त ठेवण्याच्या सूचना पोलिसांना देण्यात आल्या आहेत. ज्या ठिकाणी वृक्ष तोडीची शक्‍यता आहे, अशा ठिकाणी जाऊन आधीच ताकीद देण्याच्या सूचनाही पोलिस ठाण्यातील सर्व जनसंपर्क अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर फ्रेन्ड ऑफ ट्रीज, ट्री ऑथोरिटी, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी, वर्ल्ड वाईंड लाईफ या सारख्या सेवाभावी संस्था वृक्ष तोंड करणाऱ्यावर नजर ठेवून राहणार आहे.वृक्ष तोडीत सहभागी व्यक्तीवर कलम २१ अंतर्गत एक हजार ते पाच हजार रुपये दंडात्मक कारवाई केली जाते.

हेही वाचाः- महिलेला डोळा मारायचा अधिकार कुणालाही नाही, आदित्य ठाकरेंनी सुनावलं

तर होळी आणि रंगपंचमी निमित्त रंग आणि गुलालाची उधळण करणं हा आपल्या संस्कृतीचाच भाग मानला जातो. मात्र, गुलालात होत असलेली भेसळ आणि रंगात वाढलेला केमिकलचा वापर त्यामुळे कुठल्याही व्यक्तीला ञास होण्याची भीती व्यक्त होत आहे. पर्यावरणपूरक गुलाल खरेदी करण्यासाठी ४० किलोचे पोतं खरेदी करावं लागतं आणि त्याचा दर ८०० रुपये आहे. तसंच, हा गुलाल खुल्या स्वरूपात (सुटा) विकला जात नसल्यामुळे त्याला मागणी कमी आहे. त्याचवेळी, रासायनिक गुलालाचं २० किलोचं पोतं केवळ ३८० रुपयांना उपलब्ध आहे. सुट्या स्वरूपातही हा गुलाल मिळत असल्याने हा गुलाल विकत घेण्याकडे नागरिकांचा कल वाढला आहे, अशी माहिती खुद्द गुलाल विक्रेत्यांनीच नाव न छापण्याच्या अटीवर दिली. नाशिक आणि जळगावहून विक्रीसाठी आलेला हा रासायनिक गुलाल सध्या मुंबईच्या नाक्यानाक्यावर विकला जात आहे. धुलिवंदनाच्या पार्श्‍वभुमिवर घातक रासायनिक रंग विकणाऱ्या विक्रेत्यांवरही कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत.त्यामुळे प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बीट मार्शला त्यांच्या परिसरातील अशा रंग विक्रेत्यांवर लक्ष ठेवण्यास सांगण्यात आले आहे.

हेही वाचाः- जीडीपीत महाराष्ट्राची ५ स्थानावर घसरण

पर्यावरणपूरक, शुद्ध गुलाल हा नैसर्गिक घटकांपासून तयार केला जातो. त्यासाठी पलाश, टीसफुले, हळद, बिल्वा वनस्पती, कुमकुम यांचा वापर होतो. या गुलालाचा रंग रासायनिक गुलालाच्या तुलनेत अधिक गडद असतो. यामुळे त्वचेला अपाय होत नाही आणि पाण्यात धुतल्यास हा गुलाल सहज निघतो. रासायनिक गुलाल फिकट रंगाचा असला तरी त्याला कृत्रिम चमक असते. या गुलालात लेड ऑक्साइड, कॉपर सल्फरसारखी विविध रसायने तसेच शिसे, आरारूट आदी घातक पदार्थ असतात. तर काही गुलालात संगमरव्हरी लाद्या कापताना पडलेला भुगाही वापरतात. हा गुलाल पाण्याने धुतल्यावर सहजासहजी जात नाही आणि नागरिकांच्या डोळ्यात गेल्यास अंपगत्व येण्याची भीती असल्याचं तज्ज्ञांनी सांगितलं.



Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा