खंडणीखोर पत्रकार अटकेत


खंडणीखोर पत्रकार अटकेत
SHARES

मुंबईत पत्रकार असल्याचे सांगून एका ब्युटी पार्लर चालवणाऱ्या महिलेकडे खंडणी मागणाऱ्या दोन बोगस पत्रकारांना गोरेगाव पोलिसांनी अटक केली आहे. अंकित रामफल गुप्ता, अभिनंदन अशोककुमार पानिवाला अशी या दोघांची नावे आहेत. एका सलून मालकाला दुकानाची तक्रार न करण्यासाठी 50 हजार रुपयांची खंडणी मागत होते. या प्रकरणी गोरेगाव पोलिस अधिक तपास करत आहेत.

गोरेगावच्या सिद्धार्थसर्कलजवळ बिग बओर शाळेजवळ 33 वर्षीय तक्रारदार महिलेचे ब्युटी पार्लर आणि स्पा शाँप आहे. मागील अनेक दिवसांपासून आरोपी अंकित रामफल गुप्ता, अभिनंदन अशोककुमार पानिवाला हे महिलेजवळ ब्युटी पार्लरची तक्रार, कामगारांना त्रास न देण्यासाठी धमकावत होते. त्या बदल्यात ते  50 हजार रुपये खंडणी मागत होते. त्या दोघांच्या धमकीला घाबरून महिलेने 50 हजार रुपये दिले देखील, मात्र या काही दिवस उलटत नाही तोच या दोघांनी पून्हा महिलेला 50 हजार रुपये खंडणी मागण्यास सुरूवात केली. या दोघांच्या रोजच्या त्रासाला कंटाळून अखेर महिलेने गोरेगाव पोलिसात तक्रार नोंदवली.

हेही वाचाः- 'त्या' पार्टीची पुन्हा चौकशी; करण जोहर याला NCB कडून समन्स

महिलेने नोंदवलेल्या तक्रारनुसार पोलिसांनी अंकित रामफल गुप्ता, अभिनंदन अशोककुमार पानिवाला दोघांवर 120 (ब), 384, 385,34 भा.द.वि कलमांतर्गत गुन्हा नोंदवून दोघांना अटक केली आहे. यातील अभिनंदन  पानिवाला याच्यावर या पूर्वीही समतानगर पोलिस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. अशा प्रकारे या दोघांनी या पूर्वीही अनेकांना ठगवले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या अनुषंगाने पोलिस अधिक तपास करत आहेत.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा