'त्या' पार्टीची पुन्हा चौकशी; करण जोहर याला NCB कडून समन्स


'त्या' पार्टीची पुन्हा चौकशी; करण जोहर याला NCB कडून समन्स
SHARES

नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोने (NCB) अभिनेता आणि दिग्दर्शक करण जोहरला चौकशी संदर्भात समन्स पाठवला आहे. त्यामुळे करण लवकरच NCB आँफीसला चौकशीसाठी हजर राहू शकतो. करणच्या घरात २०१९ मध्ये झालेल्या एका पार्टीचा व्हिडिओ वायरल झाला होता. त्या पार्टीत अंमली पदार्थाचे सेवन उपस्थित कलाकारांनी केल्याचा आरोप केला जात होता. मात्र एनसीबीनं करण जोहर यांच्यावर कोणत्याही प्रकरणात संशय नाही. ड्रग्जशी संबंधित काही माहिती मिळविण्यासाठी त्यांना बोलावण्यात येत असल्याचं स्पष्ट केलं आहे.

हेही वाचाः- भारतात बंदी असूनही PUBG ठरला सर्वाधिक कमाई करणारा गेम

बॉलिवूडमधील ड्रग्ज कनेक्शन समोर आल्यानंतर करन जोहर यांच्या अडचणीत वाढ झाली होती. करण जोहर यांच्या घरी आयोजित पार्टीमधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. सांगितले जात आहे की, करण जोहरने हा व्हिडीओ शूट केला होता आणि या व्हिडीओमध्ये मलायका अरोरा, रणबीर कपूर, विक्की कौशल, वरुण धवन, शकून बत्रा, जोया अख्तर, अर्जुन कपूर, अयान मुखर्जी, दीपिका पादुकोन आणि कार्तिक आर्यन सारख्या कलाकारांचा सहभाग होता. त्यावेळी अशी चर्चा सुरू होती की एनसीबीकडून करण जोहर आणि या व्हिडीओमधील कलाकारांवर कारवाई केली जाईल. या व्हिडिओचा आधार घेत शिरोमणी अकाली दलाचे मंजिदंर सिंह सिरया यांनी NCB चे प्रमुख राकेश अस्थाना यांच्याजवळ तक्रार करत या पार्टीची चौकशी करण्याची मागणी केली होती.

हेही वाचाः- मेसेज येणार तरच कोरोना लस मिळणार- राजेश टोपे

मात्र NCB न दिलेल्या सूचनेनुसार ड्रग्ज संदर्भात काही माहीती हवी असल्याने करण यांना समन्स बजावण्यात आले आहे. त्यासाठी त्यांना स्वत: येण्याची गरज नसून त्यांनी त्याचा प्रतिनिधी पाठवावा. त्यांना २०१९ मध्ये झालेल्या पार्टीशी संबंधित सर्व रेकॉर्ड शेअर करावे लागतील. तसेच त्या पार्टीत कोण कोण सहभागी होते.कुणाच्या  कॅमेऱ्याने व्हिडीओ शूट केला होता. कुणी सोशल मिडियावर प्रसिद्ध केला. आदी माहिती शुक्रवारी १८ डिसेंबरपर्यंत पाठविण्यास सांगण्यात आलं आहे. मूळात या व्हिडिओचं स्पष्टीकरण या पूर्वीच करण जोहरने दिलं आहे. यामध्ये त्यांनी लिहिलं होतं की, मी ड्रग्ज घेत नाही आणि प्रमोटही करीत नाही. माझ्या घरी २८ जुलै २०१९ मध्ये झालेल्या पार्टीत ड्रग्ज घेतल्याच्या चुकीच्या बातम्या पसरवल्या जात आहे. मी २०१९ मध्येच सांगितलं होतं की या सर्व बातम्या खोट्या आहेत. ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने करन जोहरची कंपनी धर्मा प्रोडक्शनचे कार्यकारी प्रॉड्यूसर क्षितिज प्रसाद याला ताब्यात घेतलं होतं. क्षितिजला अटकेत घेतल्यानंतर करनने स्पष्टीकरण दिलं होतं.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा