Advertisement

मेसेज येणार तरच कोरोना लस मिळणार- राजेश टोपे

कोरोनावरील लसीकरणासाठी प्राधान्यक्रम ठरवण्यासोबत ही लस कशा रितीने देण्यात येईल, याची कार्यपद्धती निश्चित करण्यात आल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

मेसेज येणार तरच कोरोना लस मिळणार- राजेश टोपे
SHARES

कोरोना विषाणूला प्रतिबंध करणाऱ्या लशींची चाचणी अंतिम टप्प्यात आलेली असताना केंद्र सरकारसोबतच महाराष्ट्र सरकारने (maharashtra government) देखील लसीकरणाची पूर्व तयारी सुरू केली आहे. कोरोनावरील लसीकरणासाठी प्राधान्यक्रम ठरवण्यासोबत ही लस कशा रितीने देण्यात येईल, याची कार्यपद्धती देखील निश्चित करण्यात आल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

या कार्यपद्धतीसंदर्भात प्रसारमाध्यमांना माहिती देताना राजेश टोपे यांनी सांगितलं की, सीरम आणि भारत बायोटेक या दोन कंपन्यांनी कोरोनावरील (coronavirus vaccination) लसीसाठी केंद्र सरकारकडे परवानगी मागितली आहे. केंद्र सरकारने डिसेंबरअखेरपर्यंत ही परवानगी दिली आणि राज्यांनाही लसीकरणासाठी अनुमती दिली, तर जानेवारीपासून देशात लसीकरणाला सुरूवात होऊ शकते.

लसीकरणासाठी केंद्र सरकारकडून मायक्रो प्लानिंग करण्यात येत आहे. केंद्र सध्या राज्यांकडून डेटा गोळा करत आहे. आरोग्य सेवेतील कर्मचारी, अत्यावश्यक सेवांमधील कर्मचारी, ५० वर्षांवरील नागरिक व ५० वर्षांखालील व्याधीग्रस्त नागरिक अशा पद्धतीने डेटा तयार केला जात आहे. या वर्गवारीनुसार लसीकरण केलं जाईल. 

हेही वाचा- कोरोना लसीकरणासाठी केंद्र सरकारकडून गाईडलाईन्स जारी, 'अशी' देणार लस

राज्यात लशीच्या स्टोरेजसाठी कोल्डचेन व्यवस्था झाली आहे. लसीकरणासाठी १८ हजार कर्मचाऱ्यांना ट्रेनिंग देण्याचं काम लवकरच पूर्ण होईल. केवळ केंद्राच्या निर्णयाची आणि परवानगीची प्रतीक्षा आहे. लस देण्यासाठी एक कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसारच लसीकरण केलं जाईल, असं राजेश टोपे (rajesh tope) म्हणाले.

मतदानासाठी ज्या पद्धतीने बूथ उभारले जातात त्याच पद्धतीने लसीकरणासाठी बूथ उभारले जातील. ज्या तारखेला लस द्यायची आहे, त्या संबंधीचा मेसेज त्या व्यक्तीला केला जाईल. तो मेसेज आल्यावर संबंधित व्यक्तिला दिलेल्या ठिकाणी ओळखपत्रासह जावं लागेल. त्याची ओळख पटल्यावर लस दिली जाईल. त्यानंतर तिथं अर्धा तास थांबवून नंतर पाठवलं जाईल, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली. 

 राज्य सरकारने जी कामे करायची आहेत त्यावर आम्ही लक्ष केंद्रीत केलं असून लसीकरणाचा खर्च केंद्र सरकारकडून करण्यात येईल, अशी अपेक्षा आहेत. राज्यात लसीकरणासाठी पुरेशा प्रमाणात कर्मचारी वर्ग असल्याने चिंता करण्याचं कारण नाही, असंही राजेश टोपे यांनी सांगितलं.

(maharashtra health minister rajesh tope explains coronavirus vaccination procedure from state government)

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा