Advertisement

भारतात बंदी असूनही PUBG ठरला सर्वाधिक कमाई करणारा गेम

२०२० या आर्थिक वर्षात सर्वाधिक कमाई करणाऱ्या गेमच्या यादीत पबजी पहिल्या नंबरवर आहे.

भारतात बंदी असूनही PUBG ठरला सर्वाधिक कमाई करणारा गेम
SHARES

पबजी मोबाईल गेम (PUBG) भारतात मोठ्या प्रमाणात लोकप्रिय आहे. भारत सरकारनं सप्टेंबर महिन्यात पबजी गेमवर बंदी घातली. परंतु इतर देशांमध्ये ही गेम अजूनही खेळला जातो. त्यामुळे पबजी गेम जगभरात सर्वाधिक कमाई करणारा गेम ठरला आहे.

२०२० या आर्थिक वर्षात सर्वाधिक कमाई करणाऱ्या गेमच्या यादीत पबजी पहिल्या नंबरवर आहे. सेन्सर टॉवरच्या (Sensor Tower) रिपोर्टनुसार ॲपल अ‍ॅप स्टोअर आणि गुगल स्टोअरवर सर्वाधिक कमाई करणारा गेम ठरला आहे. भारतात बंदी असून देखील कंपनीनं यावर्षी १ बिलियन डॉलर म्हणजेच अंदाजे ७ हजार ३५१ कोटी रुपयांची कमाई केली.

ऑनलाइन ॲनॅलिटिक्स फर्म सेन्सर टॉवरच्या डेटानुसार (Sensor Tower's Store Intelligence data) पबजी गेम आणि चीनमधील 'Game For Peace' या गेमने 2020 या आर्थिक वर्षात २.६ बिलियन म्हणजेच अंदाजे १९ हजार ११३ कोटी रुपयांची कमाई केली आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, २०१९ च्या तुलनेत यात ६४.३ टक्क्यांची वाढ झाली आहे.

पबजी नंतर सर्वात जास्त कमाई करणाऱ्या गेमच्या यादीत, दुसऱ्या क्रमांकावर Honor of Kings हा गेम आहे. या गेमनं यावर्षी २.५ बिलियन म्हणजेच अंदाजे १८ हजार ३७८ कोटी रुपयांची कमाई केली आहे.

कोरोनाच्या या कठीण काळात अनेकजण घरी असल्यानं यावर्षी मोबाईल गेमची कमाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सर्वच मोबाईल गेमच्या कमाईमध्ये वाढ झाली आहे. यावर्षी ७५ बिलियन डॉलर्सची कमाई झाली असून २०१९ च्या तुलनेत यात १९.५ टक्के वाढ झाली आहे.

भारतात पबजी वर बंदी आहे. कंपनी पुन्हा एकदा भारतात पबजी गेम लाँच करण्याचा विचार करत आहे. यासाठी कंपनीनं भारतात आपली वेगळी उपकंपनी सुरु केली आहे.

त्याचबरोबर मुख्य कंपनीनं चीनमधील Tencent Games या कंपनीशी करार मोडला आहे. भारतीय युजर्सला लक्षात घेऊन पबजी मोबाईल इंडिया (PUBG Mobile India) नावाचा नवीन गेम आणणार आहे.



हेही वाचा

प्रवासी वाहनांच्या विक्रीत नोव्हेंबरमध्ये मोठी वाढ

ज्येष्ठ नागरिकांना एअर इंडिया देणार हाफ तिकिट

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा