Advertisement

ज्येष्ठ नागरिकांना एअर इंडिया देणार हाफ तिकिट

विमान प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना केंद्र सरकारने मोठी भेट दिली आहे. ज्येष्ठ नागरिकांना आता एअर इंडियाचे तिकिट निम्म्या दरात मिळणार आहे.

ज्येष्ठ नागरिकांना एअर इंडिया देणार हाफ तिकिट
SHARES

विमान प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना केंद्र सरकारने मोठी भेट दिली आहे. ज्येष्ठ नागरिकांना आता एअर इंडियाचे तिकिट निम्म्या दरात मिळणार आहे. विमानोड्डाण मंत्रालयाने बुधवारी ही माहिती दिली. 

एअर इंडियाच्या वेबसाईटवर या योजनेची माहिती देण्यात आली आहे. यानुसार देशातील कोणत्याही ६० वर्षे पूर्ण झालेल्या नागरिकाला एअर इंडियाचं हाफ तिकिट  मिळणार आहे. मात्र यासाठी काही अटी असणार आहेत. एअर इंडियाकडून ही योजना या आधीही देण्यात येत होती. मात्र आता याला मंत्रालयाकडून मान्यता देण्यात आली आहे.

 अटी

  • प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाकडे भारतीय नागरिकत्व हवे. 
  • भारतात स्थायिक असलेल्या नागरिकांचे वय ६० वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक असायला हवे.
  • प्रवासाच्या सात दिवस आधी बुकिंग करावे लागेल. 
  • तिकिट १ वर्ष मुदतीसाठी लागू. 
  • भारतात कोणत्याही विभागात प्रवासासाठी लागू. 
  • इकॉनॉमी केबिनमध्ये बुकिंग श्रेणीच्या मूळ भाड्याच्या ५० टक्के रक्कम द्यावी लागेल.

हेही वाचा -

संजय गांधी नॅशनल पार्क पर्यटकांसाठी पुन्हा खुले, पण 'या' आहेत अटी

मुंबईतील हवेची गुणवत्ता खालावली, शहरातील सर्वाधिक खराब एक्यूआयची नोंद



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा