Advertisement

संजय गांधी नॅशनल पार्क पर्यटकांसाठी पुन्हा खुले, पण 'या' आहेत अटी

सकाळी ८.३० ते सायंकाळी ६.३० या वेळेत प्रवेश दिला जाईल.

संजय गांधी नॅशनल पार्क पर्यटकांसाठी पुन्हा खुले, पण 'या' आहेत अटी
SHARES

करोना प्रादुर्भावामुळे गेल्या साडेआठ महिन्यांपासून बंद असलेले बोरिवलील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान मंगळवारपासून पर्यटकांसाठी खुले करण्यात आले. मात्र, उद्यानातील व्याघ्र आणि सिंह विहार, नौका विहार या सुविधा सध्या बंद राहणार आहेत. तसंच उद्यानात खासगी वाहनांना पूर्णत: प्रवेशबंदी असणार आहे.

पर्यटकांना उद्यानामध्ये मर्यादित ठिकाणीच प्रवेश असणार आहे. सकाळी ८.३० ते सायंकाळी ६.३० या वेळेत प्रवेश दिला जाईल. तसंच खासगी वाहनांना प्रवेश बंद असून, उद्यानाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ सशुल्क पार्किंगची सुविधा असेल. उद्यानात फिरण्यासाठी बेस्टच्या बसगाडय़ांची सुविधा असेल. उद्यानात तापमान, मुखपट्टय़ा तपासूनच प्रवेश दिला जाईल.

उद्यानात निर्धारित केलेल्या मार्गाचाच अवलंब पर्यटकांना करावा लागेल. कान्हेरी गुंफा अद्याप पर्यटकांसाठी खुल्या झाल्या नसल्यानं केवळ तुमणीपाडा फाटकापर्यंतच फिरता येईल. गर्दी नियंत्रित करण्यासाठी नौका विहार, वनराणी, व्याघ्र आणि सिंह विहार ही ठिकाणे पर्यटकांसाठी बंद राहतील. त्याचबरोबर शासनानं वेळोवेळी दिलेल्या निर्देशांचे पालन पर्यटकांना करणं बंधनकारक असेल.

गेल्या दोन महिन्यांत राज्यात अनेक ठिकाणी पर्यटनावर निर्बंध खुले झाले. त्याला पर्यटकांचा मोठा प्रतिसाददेखील लाभला. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान मॉर्निंग वॉक १५ ऑक्टोबरपासून खुले करण्यात आले. पाठोपाठ पर्यटकांसाठीदेखील खुले करण्याचे नियोजन होते. मात्र दिवाळीनंतर करोना संसर्ग वाढण्याची शक्यता असल्यामुळे हा निर्णय होण्यास काहीसा उशीर झाला.

बोरिवली येथील राष्ट्रीय उद्यान हे मुंबईकरांबरोबरच बाहेरून आलेल्या पर्यटकांचेदेखील आकर्षणाचे ठिकाण आहे. त्यामुळे प्रवेश शुल्कामुळे महिन्याला सुमारे ७० ते ७५ लाख रुपये महसूल जमा होतो. मात्र गेले नऊ महिने उद्यान पर्यटकांसाठी बंद राहिले. त्यामुळे गेल्या नऊ महिन्यांत सुमारे सव्वा सहा कोटी रुपयांचा महसूल बुडाला.



हेही वाचा

नाईट कर्फ्यूवर महापालिकेकडून लवकरच निर्णय

मुख्यमंत्री निवासस्थानाची पाणीपट्टी थकलेली नाही, महापालिकेचा खुलासा

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा