Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
53,44,063
Recovered:
47,67,053
Deaths:
80,512
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
36,674
1,447
Maharashtra
4,94,032
34,848

प्रवासी वाहनांच्या विक्रीत नोव्हेंबरमध्ये मोठी वाढ

सणासुदीच्या काळामुळे प्रवासी वाहनांच्या मागणीत वाढ झाल्याचे सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्यूफॅक्चरिंग (एसआयएएम) ने म्हटलं आहे.

प्रवासी वाहनांच्या विक्रीत नोव्हेंबरमध्ये मोठी वाढ
SHARES

प्रवासी वाहनांच्या विक्रीत नोव्हेंबरमध्ये ४.६५ टक्के वाढ झाली आहे. या महिन्यात  २ लाख ६४ हजार ८९८ प्रवासी वाहनं  विकली गेली आहेत.  गेल्या वर्षी याच महिन्यांत ही विक्री २ लाख ५३ हजार १३९ होती. सणासुदीच्या काळामुळे प्रवासी वाहनांच्या मागणीत वाढ झाल्याचे सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्यूफॅक्चरिंग (एसआयएएम) ने म्हटलं आहे.

एसआयएएमच्या आकडेवारीनुसार, नोव्हेंबरमध्ये दुचाकींची विक्री १३.४३ टक्क्यांनी वाढली आहे.  नोव्हेंबरमध्ये १ ६ लाख ३७९ दुचाकी विकल्या गेल्या आहेत.  गेल्या वर्षी याच कालावधीत १४ लाख १० हजार ९३९ दुचाकी वाहने विकली गेली होती. मोटरसायकलची विक्री १० लाख २६ हजार ७०५ इतकी झाली. गेल्या वर्षी हा आकडा ८ लाख ९३ हजार ५३८ होता.

स्कूटरच्या विक्रीत यंदा ९.२९ टक्के वाढ झाली असून नोव्हेंबरमध्ये ५ लाख २ हजार ५६१ स्कूटरची विक्री झाली. गेल्या वर्षी याच कालावधीत ४ लाख ५९ हजार ८५१ स्कूटरची विक्री झाली होती.

तीनचाकी प्रवासी वाहनांच्या विक्रीत मात्र नोव्हेंबर २०२० मध्ये तब्बल ५७.६४ टक्के घट झाली आहे. नोव्हेंबरमध्ये तीनचाकी वाहनांची फक्त २३ हजार ६२६ युनिट्सचीच विक्री झाली. गेल्या वर्षी म्हणजे नोव्हेंबर २०१९ मध्ये ५५ हजार ७७८ युनिट्स तीनचाकींची विक्री झाली होती.हेही वाचा -

संजय गांधी नॅशनल पार्क पर्यटकांसाठी पुन्हा खुले, पण 'या' आहेत अटी

मुंबईतील हवेची गुणवत्ता खालावली, शहरातील सर्वाधिक खराब एक्यूआयची नोंदसंबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा