मुंबई दहशतवादी हल्ला : तहव्वूर राणाला भारताच्या ताब्यात देण्यास अमेरिकन कोर्टाची मान्यता

26 नोव्हेंबर 2008 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील त्याच्या भूमिकेसाठी भारताने त्याच्या प्रत्यार्पणाची विनंती केली होती.

मुंबई दहशतवादी हल्ला : तहव्वूर राणाला भारताच्या ताब्यात देण्यास अमेरिकन कोर्टाची मान्यता
SHARES

मुंबईवर झालेल्या 26 /11 दहशतवादी हल्ल्यातील मोठी अपडेट समोर आली आहे. (Mumbai Attack) कॅलिफोर्निया येथील अमेरिकेतील न्यायालयाने 2008 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणा याला भारताकडे सुपूर्द करण्यास परवानगी दिली आहे.

10 जून 2020 रोजी भारताने 62 वर्षीय राणाला प्रत्यार्पणाच्या उद्देशाने तात्पुरती अटक करण्याची तक्रार दाखल केली. अमेरिकन अध्यक्ष ज्यो बायडेन प्रशासनाने राणाच्या भारतात प्रत्यार्पणाला पाठिंबा दिला आणि त्याला मान्यताही दिली. त्यामुळे भारताला हे मोठे यश मिळाले आहे.

16 मे रोजीच्या 48 पानांच्या आदेशात, कॅलिफोर्नियाच्या सेंट्रल डिस्ट्रिक्टसाठी जिल्हा न्यायालयाच्या न्यायाधीश जॅकलिन चूलजियन यांनी सांगितले की, भारताने सुनावणीच्या वेळी सादर केलेल्या युक्तिवादांमध्ये आणि सर्व कागदपत्रांचे न्यायालयाने पुनरावलोकन केले आणि त्यावर विचार केला. ज्या गुन्ह्यांसाठी त्याच्या प्रत्यार्पणाची विनंती करण्यात आली आहे त्या गुन्ह्यांसाठी 62 वर्षीय तहव्वूर राणा प्रत्यार्पण करण्यायोग्य असल्याचा निष्कर्ष न्यायालयाने काढला आहे, असे न्यायाधीशांनी सांगितले.



हेही वाचा

रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्याला अटक

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा