पाकिस्तानी मुलीच्या प्रेमासाठी त्याने घर सोडलं


पाकिस्तानी मुलीच्या प्रेमासाठी त्याने घर सोडलं
SHARES

फेसबुकवर पाकिस्तानमधील तरुणीच्या प्रेमात पडून मुलुंडमधील एका 23 वर्षीय तरुणाने घर सोडल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. जगदीश परिहार असं या मुलाचं नाव आहे. घर सोडण्यापूर्वी त्याने घरातल्यांना फोन करून 'मला हिंदू धर्म आवडत नाही, मी मुस्लिम धर्म स्वीकारला असून मला संपर्क करू नका' असं सांगून त्याने फोन ठेवून दिला. याप्रकरणी मुलुंड पोलिस त्याचा शोध घेत आहेत.


संपूर्ण प्रकार

मुलुंड परिसरात राहणाऱ्या जगदीशच्या वडिलांचं त्याच भागात चष्मा विक्रीचं दुकान आहे. जगदिश कॉलेज शिकत दुकानात काम करून आपल्या वडिलांना मदत करायचा. जगदिश हा कॉलेजमध्ये वाणिज्य शाखेत शिकत आहे. जगदिश बेपत्ता झाल्यानंतर त्याच्या मित्रांकडे केलेल्या चौकशीतून तो मागील एका वर्षापासून फेसबुकवर एका पाकिस्तानी तरुणीच्या संपर्कात होता. यापूर्वी ही घरातल्यांना ही बाब निदर्शनास आणून दिली होती. त्यावेळी घरातल्यांनी त्याला हटकत त्या तरुणीशी संपर्क तोडण्याबाबत वारंवार सांगितलं. मात्र जगदिश छुप्या पद्धतीने तिच्या संपर्कात होता.


फेसबुक अकाऊंट केलं डिलीट

जगदिश हा मंगळवारी बेपत्ता झाला. मात्र बेपत्ता होण्याच्या काही दिवसांपूर्वी त्याने त्याच्या खात्यातून मोठ्या प्रमाणात रक्कम काढली. घरातून निघून गेल्यानंतर त्याचं शेवटचं लोकेशन हेदेखील मुंबई विमानतळावर आढळून आलं आहे. त्याने जाण्यापूर्वी स्वत:चं फेसबुक अकाऊंही डिलिट केलं असून त्याचा माघ काढणे अवघड जात आहे.


'भूलथापांना बळी पडू नका'

जगदिश सोबत घडलेला प्रकार हा अत्यंत धक्कादायक असून पालकांनी आपल्या मुलांच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवणं गरजचे आहे. जेणे करून जगदिशप्रमाणे अशा भूलथापांना बळी पडून अन्य कुणाची फसवणूक होऊ नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे.
Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा