'तो' तिचे खासगी व्हिडिओ वायरल करण्याची देत होता धमकी

तिचा ई-मेल आयडी उघडल्यानंतर त्याला ते फोटो दिसले. ते फोटो पाहिल्यानंतर तो चवताळला.

'तो' तिचे खासगी व्हिडिओ वायरल करण्याची देत होता धमकी
SHARES

खासगी व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन एका तरुणीची बदनामी करणाऱ्यास गुन्हे शाखा ११ च्या पोलिसांनी अटक केली आहे. अक्षय पवार (२६) असे या आरोपीचे नाव आहे. एकतर्फी प्रेमातून त्याने हे कृत्य केल्याचे सांगितले जाते. या प्रकरणी गुन्हे शाखेचे पोलिस अधिक तपास करत आहेत.

हेही वाचाः-सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण : बॉलीवूडच्या 'या" सेलेब्रिटींची होऊ शकते चौकशी

ठाण्याच्या कळवा परिसरात राहणारा आरोपी अक्षय आणि पीडित मुलीची ओळख २०१३-१४ मध्ये इंजिनिअरिंगचे शिक्षण घेताना झाली होती. याच दरम्यान मुलीने तिच्या एका दुसऱ्या मित्रासोबतचे फोटो तिच्या ई-मेल आयडीवर सेव करून ठेवले. अक्षयने मुलीला न विचारचा तिचा ई-मेल आयडी उघडल्यानंतर त्याला ते फोटो दिसले. ते फोटो पाहिल्यानंतर अक्षय चवताळला. राग अनावर झालेल्या अक्षयने इन्स्टाग्रामवर बनावट खाते उघडून मुलीला त्रास देण्यास सुरूवात केली. तसेच तिचे खासगी व्हिडिओ आणि फोटो सोशल मिडियावर वायरल करून बदनामी करण्याची धमकी देऊ लागला. अक्षयच्या त्रासाला कंटाळून अखेर ही बाब मुलीने घरातल्यांना सांगितली. मुलीच्या घरातल्यांनी पोलिसात तक्रार नोंदवल्यानंतर गुन्ह्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठांनी हा गुन्हा गुन्हे शाखा ११ कडे वर्ग केला.

हेही वाचाः-धक्कादायक घटना ! क्वारंटाईन सेंटरमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग

पोलिसांनी तपासाला सुरूवात केल्यानंतर यात अक्षयचा सहभाग निश्चित झाला. त्यानुसार पोलिसांनी अक्षयला ताब्यात घेतले. त्याच्या विरोधात बोरिवली पोलिस ठाण्यात ३५४(ड), २९२(२), ५०४, ५०६ कलमांतर्गत गुन्हा नोंदवून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा