धक्कादायक घटना ! क्वारंटाईन सेंटरमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग

सोमवारी सॅनटायझर फवारणी करणा-या तरुणाने तिचा विनयभंग करत चुंबन घेण्याचा प्रयत्न केला. या प्रकाराला मुलीने विरोध केला असता, आरोपीने तिच्या कानाखाली मारली.

धक्कादायक घटना ! क्वारंटाईन सेंटरमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग
SHARES

नवी मुंबईच्या क्वारंटाईन सेंटरमध्ये ४० वर्षीय महिलेवर लैगिक अत्याचार झाल्याची घटना ताजी असतानाच, मानखुर्द येथे क्वारंटाईन सेंटरमध्ये १७ वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एवढ्यावरच न थांबता आरोपींनी मुलीला मारहाण केल्याचाही गंभीर प्रकार घडला आहे. याप्रकरणी मानखुर्द पोलिसांनी विनयभंग, मारहाण व बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्या अंतर्गत मानखुर्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सॅनेटायझर फवारणी करणा-या २० वर्षीय तरुणाला अटक केली आहे.

हेही वाचाः- तर महाराष्ट्रात संघर्ष अटळ, 'या' ओबीसी नेत्याचा आरक्षणासाठी सरकारला इशारा

तक्रारदार पीडित मुलगी १७ वर्षांची असून तिचा कोरोनाचा अहवाल पॉझीटीव्ह आला होता. तिच्यात कोरोनाची गंभीर लक्षण नसल्यामुळे मानखुर्द येथील म्हाडा वसाहतीतील क्वारंटाईन सेंटरमध्ये तिचे विलगीकरण करण्यात आले होते. सोमवारी सॅनटायझर फवारणी करणा-या तरुणाने तिचा विनयभंग करत चुंबन घेण्याचा प्रयत्न केला. या प्रकाराला मुलीने विरोध केला असता, आरोपीने तिच्या कानाखाली मारली. या घडलेल्या प्रकाराबाबत मुलीने सांगितल्यानंतर तात्काळ याप्रकरणी मानखुर्द पोलिसांना याची माहिती देण्यात आली. मुलीचा जबाब नोंदवल्यानंतर याप्रकरणी भादंवि कलम ३२३(मारहाण), ३५४(विनयभंग) व बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा(पोक्सो) कलम ८ व १२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून तेथे सॅनेटायझर फवारणी करणा-या दिपेश सुर्यकांत साळवी(२०) याला अटक करण्यात आली आहे.

हेही वाचाः- गुड न्यूज! वकिलांनाही आता लोकलप्रवासाची मुभा

दरम्यान, या घटनेनंतर विरोधी पक्षांनी आक्रमक पवित्र्य घेतला असून त्यांनी क्वारंटाईन सेंटरमधील सुरक्षेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याना जाब विचारला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी याप्रकरणी कंत्राटदार व पालिका अधिका-यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. चित्रा वाघ यांनीही महिला सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला असून महिला मुलींनी उपचारासाठी कोविड सेंटरमध्ये जाव की घरीच मरावं, असा जाब सरकारला विचारला आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय