तरुणीच्या घरी सेक्स टॉईज पाठवले, मुंबईतील तरुण अटकेत

लैंगिक संबंधांची मागणी करणाऱ्या व्यक्तींचा फोन येऊ लागल्यानंतर तरुणीनं फेब्रुवारीमध्ये पोलिसात तक्रार दाखल केली होती.

तरुणीच्या घरी सेक्स टॉईज पाठवले, मुंबईतील तरुण अटकेत
Representative image
SHARES

पॉर्न साईटवर एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा नंबर अपलोड करत तिला कुरियरद्वारे सेक्स टॉईज पाठवणाऱ्या एकाला अटक करण्यात आली आहे. हा तरुण मालाड इथला राहणारा आहे.

लैंगिक संबंधांची मागणी धुडकावल्याच्या रागातून सूड उगवण्यासाठी तरुणानं हे पाऊल उचलल्याचा आरोप आहे. लैंगिक संबंधांची मागणी करणाऱ्या व्यक्तींचा फोन येऊ लागल्यानंतर तरुणीनं फेब्रुवारीमध्ये पोलिसात तक्रार दाखल केली होती.

काही अज्ञात व्यक्तींनी तिला कुरियरद्वारे सेक्स टॉईज पाठवले होते. या सर्व ऑर्डर कॅश-ऑन-डिलिव्हरी तत्त्वावर देण्यात आल्या होत्या आणि पॅकेजेसवर तिचा मोबाईल नंबर होता. मात्र आरोपींचा शोध घेताना पोलिसांसमोर मोठं आव्हान होतं.

तक्रारदार तरुणीनं सांगितलं की, कुठलीही ऑनलाईन ऑर्डर न करताच काही पार्सल आपल्या घरी येत होती. मात्र सुरुवातीला तिला कुठलाच संशय आला नव्हता. कोणाकडून तरी चूक झाली असेल, अशा समजुतीतून तिनं काही पार्सल तशीच परत पाठवली. मात्र हा प्रकार नियमित घडू लागला, तेव्हा तिनं त्यापैकी एक पार्सल उघडले, त्यावेळी तिला धक्काच बसला.

कारण पार्सलच्या आत एक सेक्स टॉय होता, तर बॉक्सवर तिचंच नाव, पत्ता आणि फोन नंबरही होते. त्यानंतर तिनं मालाड पोलिसांशी संपर्क साधून तक्रार दाखल केली.

पोलिसांनी सांगितलं की पार्सल ट्रेस करणं कठीण होतं, कारण ते सर्व कॅश ऑन डिलिव्हरी तत्त्वावर नोंदवण्यात आलं होतं. “आम्ही कुरियर कंपनीशी संपर्क साधला आणि त्यांना ही ऑर्डर करणाऱ्याचा माग काढण्यास सांगितलं. त्याच वेळी पॉर्न साईटवर मुलीचा नंबर अपलोड करणाऱ्या व्यक्तीचा आयपी अॅड्रेसही आम्ही शोधायला सुरुवात केली” असं मालाड पोलिसांच्या एका अधिकाऱ्यानं सांगितलं.

“आम्ही इंटरनेट सेवा प्रदात्याशी संपर्क साधला आणि ज्यांनी त्या वेबसाईटला भेट दिली त्यांचे IP अॅड्रेस मिळवले. आम्हाला ५०० पेक्षा जास्त IP अॅड्रेस मिळाले. मग आम्ही त्या IP अॅड्रेसची यादी मागितली, ज्यावरुन सेक्स टॉयसाठी ऑर्डर देण्यात आल्या होत्या. अशा प्रकारे आम्ही आरोपीनं वापरलेला एक IP अॅड्रेस शोधून काढला आणि त्याचा शोध घेतला. त्यानुसार मुंबईतून २६ वर्षीय कुणाल अंगोळकर या आरोपीला अटक केली.


हेही वाचा

डी गँगचा फायनान्सर युसूफ लकडावालाचा आर्थर रोड जेलमध्ये मृत्यू

‘जानी दुश्मन’ फेम अभिनेता रजत बेदीच्या कारची पादचाऱ्याला धडक, गुन्हा दाखल

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा