• आंगडीयाच्या कार्यालयात घूसून चोरी करणाऱ्यांना अटक
  • आंगडीयाच्या कार्यालयात घूसून चोरी करणाऱ्यांना अटक
SHARE

गजबजलेल्या भुलेश्वर परिसरातील पोकळवाडी येथील एका आंगडीयाच्या कार्यालयात घुसून चाकूच्या धाकावर १ कोटी १३ लाख ५० हजार रुपये लूटून फरार झालेल्या तिघा आरोपींना लोकमान्य टिळक पोलिसांनी अखेर अटक केली आहे.

संजय उर्फ संतोष चौहान, जिगर पटेल, नरेंद्र जादौना अशी या तिघांची नावे असून त्यांनी २९ मे रोजी ही चोरी केली होती. याप्रकरणी लोकमान्य टिळक पोलिसांनी या तीन जणांवर कलम ३९४, ३२८, ३४२, ४५२, १२०(ब) भा.द.वी.सह कलम ३७ म.पो.क. अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.'अशी' झाली चोरी

आंगडीयाच्या कार्यालातील कर्मचारी रिपन पटेल याने कार्यालयातील रकमेची माहिती त्याचा मित्र भाविक पांचाळ याला दिली होती. भाविकने त्याच्या अहमदाबादच्या मित्रांना ही माहिती पुरवली. त्यानुसार अहमदाबाद इथून आलेल्या तीन जणांनी आंगडीयाच्या कर्यालातील रक्कम चोरली आणि हे तिघे पुन्हा अहमदाबादला पळून गेले.गोव्यातून अटक

याप्रकरणी लोकमान्य टिळक पोलिसांनी रिपन आणि भाविक याला अटक केल्यानंतर संजय उर्फ संतोष चौहान, जिगर पटेल, नरेंद्र जादौना यांचा शोध घेण्यासाठी लोकमान्य टिळक पोलिस ठाण्याचं एक पथक अहमदाबादला दाखल झालं होतं. मात्र, हे तिघेजण गोवा येथील ग्रॅंड हयात या पंचतांराकीत हॉटेलमध्ये होते. त्यावेळी पोलिसांनी तिघांना या हॉटेलमधून अटक केली. तसंच त्यांच्याकडून ९२ लाख जप्त केले. याप्रकरणी लोकमान्य टिळक पोलिसांनी या घटनेतील ८ जणांना अटक केली आहे.हेही वाचा-

कुरिअर बाॅय बनून वृद्धेची हत्या करणारा अटकेत

मुंबई पोलिसांच्या हेल्पलाईनवरील तक्रारी 120 टक्क्यांनी वाढल्यासंबंधित विषय
ताज्या बातम्या