कुरिअर बाॅय बनून वृद्धेची हत्या करणारा अटकेत


कुरिअर बाॅय बनून वृद्धेची हत्या करणारा अटकेत
SHARES

गुजरातच्या घाटलोडियामध्ये कुरिअर बाॅय बनून ८० वर्षीय महिलेची हत्या करणाऱ्या इस्तियाख अहमद खान या आरोपीस गुन्हे शाखा १० च्या पोलिसांनी जोगेश्वरी परिसरातून अटक केली अाहे.  अनेक महिन्यांपासून पोलिस त्याच्या मागावर होते. विशेष म्हणजे या हत्येची सुपारी त्या वृद्ध महिलेच्या जावयानेच दिल्याचे समोर अाले अाहे.


संपत्तीसाठी  हत्या

गुजरातच्या घाटलोडियामध्ये राहणाऱ्या राम्बा पटेल यांची २१ डिसेंबर २०१७ मध्ये हत्या झाली होती. यावेळी त्यांच्या अंगावरील दागिने चोरून नेले होते. चोरीच्या उद्देशाने ही हत्या झाली असल्याचा संशय व्यक्त करत गुजरात पोलिस हत्येचा तपास करत होते. चौकशीअंती या हत्येमागे जावई रमेश पटेल याचा हात असल्याचं निष्पन्न झालं. रमेश याचा गुजरातमध्ये रेतीचा व्यवसाय आहे. राम्बा यांना पाच मुली होत्या. त्या गर्भश्रीमंत असल्याने त्यांनी मृत्यूनंतर प्रत्येक मुलीच्या नावाने मृत्यूपत्र बनवलं होतं. याबाबतची माहिती फक्त रमेशला होती. त्यामुळे सासूचा काटा काढल्यानंतर तिची संपत्ती हडपण्याचा रमेशने डाव रचला.


५ लाखात सुपारी
 

हत्येची सुपारी देण्यासाठी रमेशने त्याचा मुंबईतला व्यावसायिक मित्र लतिक शेखची मदत घेतली. लतिकने ५ लाख रुपयात राम्बा यांच्या हत्येची सुपारी जोगेश्वरीच्या कोळीगुंफा नं १ येथे राहणाऱ्या इस्तियाख अहमद खान याला दिली. त्यानुसार इस्तियाखने कुरिअर बाॅय बनून घरात प्रवेश करत राम्बा यांची हत्या केली. या हत्येचा उलगडा लागल्यानंतर पोलिसांनी रमेश आणि लतिक यांना अटक केली होती. मात्र, इस्तियाख फरार झाला होता.

इस्तियाख हा जोगेश्वरीत लपून बसला असल्याची माहिती गुन्हे शाखा १० चे सहाय्यक पोलिस निरीक्षक वाहिद पठाण यांना मिळाली. त्यानुसार पठाण यांच्यासह सपोनी गंगाधर मुदीराज, पोलिस हवालदार अंकुश नार्वेकर, चंद्रकांत गवेकर, श्रीधर चव्हाण यांनी सापळा रचून सोमवारी इस्तियाखला जोगेश्वरीतून अटक करत, त्याचा ताबा पुढील तपासासाठी गुजरात पोलिसांकडे दिला. या पूर्वीही २०१६ मध्ये इस्तियाखला बनावट देशी कट्टा आणि जिवंत काडतुसासह पोलिसांनी अटक केली होती.



हेही वाचा -

विवाहितेत त्रास देणारा अटकेत

तोतया अधिकारी जेरबंद



 

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा