विवाहितेत त्रास देणारा अटकेत

मोबाइलवरून अनोळखी महिलांना फोन करून त्यांच्याशी अश्लील संभाषण करणाऱ्या एका २९ वर्षीय माथेफिरूला दादर पोलिसांनी अटक केली आहे.

विवाहितेत त्रास देणारा अटकेत
SHARES

मोबाइलवरून अनोळखी महिलांना फोन करून त्यांच्याशी अश्लील संभाषण करणाऱ्या एका २९ वर्षीय माथेफिरूला दादर पोलिसांनी अटक केली आहे. सतीश साळुंखे असं या आरोपीचं नाव असून तो मूळचा साताऱ्याचा राहणारा आहे. कुर्ला इथं राहणाऱ्या मेव्हण्याकडे आला असताना पोलिसांनी सतीशला अटक केली.

साताऱ्याच्या खानापूर तालुक्यातील देऊळ आळी गावात राहणाऱ्या सतीशने ३० मे रोजी दुपारी ३ वाजता दादरमध्ये राहणाऱ्या एका विवाहितेला फोन केला. पीडित महिला गरोदर असून त्या घरी आराम करत होत्या. फोन उचलल्यानंतर सुरूवातीला सतीशने तुम्हाला मुंबई परिसरात घर हवं आहे का ? अशी विचारणा केली. त्याला महिलेने नकार देताच. त्याने महिलेला लग्नासाठी मागणी घातली. एवढ्यावरच न थांबता तो महिलेवर भेटण्यासाठी दबाव टाकू लागला.


व्हाॅट्सअॅपवरून विवस्त्र दर्शन

विवाहितेने त्याला हटकत फोन कट करूनही सतीश वारंवार फोन करून विवाहितेला त्रास देऊ लागला. त्यामुळे विवाहितेने त्याचा फोन ब्लाॅक केला. तरीही सतीश व्हाॅट्स अॅपवरून विवाहितेला व्हिडिओ काॅल करू लागला. याच तऱ्हेने तो एकदा चक्क विवस्त्र अवस्थेत व्हिडिओ काॅलमध्ये समोर आला. पीडितेने घाबरून त्याचा व्हाॅट्सअॅपही ब्लाॅक केल्यानंतर सतीशने तिला फेसबुकवर मेसेज पाठवण्यास सुरूवात केली. फेसबुक मेसेंजरद्वारे व्हाॅईस काॅलिंग करून पुन्हा विवाहितेला त्रास देऊ लागला.


जीवे मारण्याची धमकी

घडलेला प्रकार विवाहितेने आपल्या पतीला सांगितल्यानंतर त्याने सतीशला खडसावल्यावर सतीशने त्याला जीवे मारण्याची धमकी दिली. तेव्हा विवाहितेने दादर पोलिस ठाण्यात सतीशविरोधात तक्रार नोंदवली.


'अशी' केली अटक

या प्रकरणी दादर पोलिस तपास करत असताना. सतीश खानापूरचा रहिवासी असल्याचं कळालं. पोलिसांनी त्याचा माग काढल्यावर सतीश त्याच्या मेव्हण्याकडे कुर्ल्यातील इराणीचाळ, टकियावाड इथं रहात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सतीशला कुर्ला परिसरातून सोमवारी अटक केली. सतीशने अशा प्रकारे किती जणांना त्रास दिला आहे आणि त्रास देण्यामागचे कारण काय? याचा पोलिस शोध घेत आहेत.



हेही वाचा-

मुंबई पोलिसांच्या हेल्पलाईनवरील तक्रारी 120 टक्क्यांनी वाढल्या

गुजरातच्या दुहेरी हत्याकंडातील मुख्य आरोपीला भायखळ्यातून अटक



Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा