गुजरातच्या दुहेरी हत्याकंडातील मुख्य आरोपीला भायखळ्यातून अटक


गुजरातच्या दुहेरी हत्याकंडातील मुख्य आरोपीला भायखळ्यातून अटक
SHARES

गुजरातच्या दीव-दमण इथल्या विशाल बार आणि रेस्टॉरंटमध्ये मार्च महिन्यात पाच जणांनी दोन व्यावसायिकांची गोळ्या झाडून हत्या केली होती. या घटनेनंतर सर्व आरोपी पसार झाले होते. आरोपी मुंबईत लपल्याची माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखा ३च्या पोलिसांनी मोठ्या शिताफीनं भायखळा परिसरातून या हत्याकांडातील मुख्य आरोपी मोहम्मद हसन अब्दुल अजीज सिद्धीकी (४४) याला अटक केली आहे


काय आहे प्रकरण?

गुजरातमध्ये गुटखा स्क्रॅपच्या अवैध धंद्यामागे तिथले स्थानिक व्यावसायिक अजय रमण पटेल (३५), धिरेंद्र पटेल (३४) यांचा वरदहस्त होता. यावरून आरोपी आणि व्यावसायिकांमध्ये वाद सुरू होते. हाच वाद विकोपाला गेल्यानं सिद्धीकीनं दोन्ही व्यावसायिकांचा काटा काढण्याचे ठरवले होते. त्यानुसार १ एप्रिलला अजय आणि धिरेंद्र हे गुजरातच्या दमण इथल्या मेन रोड दाभेलवरील विशाल रेस्टॉरंटमध्ये मद्यप्राशन करण्यासाठी आले होते. त्यावेळी कारमधून आलेल्या पाच जणांनी बंदुक, देशी कट्टा आणि  देशी रायफलच्या मदतीनं दोघांवर गोळीबार करत त्यांची हत्या केली होती. हे सर्व प्रकरण सीसीटिव्हीत कैद झाले होते. पोलिस मागावर असल्याचे कळाल्यानंतर सर्व आरोपी राज्याबाहेर पळून गेले. यातील मुख्य आरोपी सिद्धीकी हा ईद निमित्तानं भायखळा इथल्या नातेवाईकांना भेटायला येणार असल्याची माहिती गुजरात पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार गुजरात पोलिसांनी मुंबई पोलिसांकडे सिद्धिकीच्या अटकेसाठी मदत मागितली. त्यावेळी गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जगदीश साईल यांनी भायखळा परिसरात सापळा रचून सिद्धीकीला अटक केली.

सिद्धीकी याचा ताबा अधिक तपासासाठी गुजरात पोलिसांना देण्यात आल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे. त्याच बरोबर २००५ मधील एका गंभीर खटल्यामध्ये अटकेत असलेला आरोपी दिनेश पटानी हा जामीनावर बाहेर आल्यानंतर फरार होता. पटानी हा वरळी परिसरात येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्याला देखील अटक केली आहे


हेही वाचा

रेल्वेत पुन्हा तरुणीचा विनयभंग, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

संबंधित विषय
POLL

आजच्या पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्स किती धावांचा डोंगर रचेल, असे वाटते ?
Submitting, please wait ...
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा