मुंबई पोलिसांच्या हेल्पलाईनवरील तक्रारी 120 टक्क्यांनी वाढल्या

नागरिकांच्या तक्रारींचं निवारण करण्यासाठी पोलिसांतर्फे 100 नंबरची हेल्पलाईन सुरू आहे. या हेल्पलाईनवर नागरिकांकडून करण्यात येणाऱ्या तक्रारींचा ओघ दिवसेंदिवस वाढत आहे. 2017 मध्ये वर्षभरात 15 कोटी 80 लाख तक्रारींची नोंद करण्यात आली होती. मात्र मुंबई पोलिसांच्या या हेल्पलाईनवर मागच्या वर्षीच्या तुलनेत तक्रारींचं प्रमाण यंदा 120 टक्क्यांनी वाढलं आहे.

मुंबई पोलिसांच्या हेल्पलाईनवरील तक्रारी 120 टक्क्यांनी वाढल्या
SHARES

नागरिकांच्या तक्रारींचं निवारण आणि त्यांना मदत मिळण्यासाठी पोलिसांतर्फे 100 नंबरची हेल्पलाईन सुरू आहे. या हेल्पलाईनवर नागरिकांकडून करण्यात येणाऱ्या तक्रारींचा ओघ दिवसेंदिवस वाढत आहे. 2017 मध्ये वर्षभरात 1 कोटी 58 लाख तक्रारींची नोंद करण्यात आली होती. मात्र मुंबई पोलिसांच्या या हेल्पलाईनवर मागच्या वर्षीच्या तुलनेत तक्रारींचं प्रमाण यंदा 120 टक्क्यांनी वाढलं आहे.


अशी चालते यंत्रणा

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत नागरिकांच्या सुरक्षेचा गांभीर्याने विचार केला जात आहे. नागरिकांच्या प्रत्येक तक्रारीला महत्व देण्यासाठी मुंबई पोलिसांनी 100 आणि 103 हेल्पलाईन सुरू केली. मुंबई पोलिसांच्या 100 आणि 103 या हेल्पलाईनसाठी 70 ऑपरेटर्स प्रत्येकी 8 तासांच्या दोन शिफ्टमध्ये काम करतात.

या आधुनिक यंत्रणेमुळे 100 नंबर डायल करणाऱ्या कॉलरचं लोकेशनही समजू शकतं. ते समजल्यास कोण माणूस कुठून कॉल करतो? याची माहितीही पोलिसांना मिळू लागली आहे. 


आरटीआय अंतर्गत मागवली माहीती

पोलिसांची ही सुविधा वास्तविकरित्या किती जणांना उपयोगी पडते? याबाबत माहिती अधिकार कार्यकर्त शकील अहमद शेख यांनी आरटीआय अंतर्गत माहीती मागवली होती. त्यानुसार मुंबई पोलीस मुख्य नियंत्रण कक्षातर्फे सन 2016 मध्ये 100 क्रमांकावर एकूण 7278046 आणि 103 क्रमांकावर एकूण 136349 मिळून तब्बल 7414395 तक्रारी किंवा मदतीसाठी कॉल आलेले आहे.


2017 मध्ये इतक्या तक्रारी

सन 2017 मध्ये दहा महिन्यांत 100 क्रमांकावर एकूण 1 कोटी 15 लाख 80 हजार तक्रारी किंवा मदतीसाठी कॉल आलेले आहे.

2017 मध्ये मार्च आणि एप्रिल महिन्याच्या तांत्रिक कारणास्तव माहिती उपलब्ध नाही. म्हणजे 2016 एवजी 2017 मध्ये 10 महिन्यात मुख्य नियंत्रण कक्षेत तक्रारी/मदतीसाठी 120 टक्के जास्त वाढले आहे. त्यामुळेच की काय शहरातील वाढती लोखसंख्येमागे तोकड्या पोलिसदलाला गुन्हेगारी रोखण्यात अपयश येताना दिसत आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा