तोतया अधिकारी जेरबंद


तोतया अधिकारी जेरबंद
SHARES

केंद्र सरकारमधील अधिकारी असल्याचं सांगून नागरिकांना चुना लावणाऱ्या मिलिंद लवाटे या भामट्याला गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाच्या अधिकाऱ्यांनी दिंडोशी परिसरातून अटक केली. लवाटेकडून पोलिसांनी मोठ्या प्रमाणात बोगस ओळखपत्रे, खोटी लेटरहेडस् आणि इतर साहित्य हस्तगत केलं अाहे.


लाखो रुपये उकळले 

महागड्या काळ्या काचा असलेल्या गाडीतून फिरणे, अधिकाऱ्यांसारखा पेहराव करून सतत मोबाइलवर मोठ्या गप्पा मारून सर्वसामान्यांना लहाटे आकर्षित करायचा. केंद्रात सरकारी खात्यात अधिकारी असल्याचं सांगून त्याने अनेक नागरिकांना गंडवण्यास सुरूवात केली होती.
नोकरी तसंच अर्थसहाय्य मिळवून देण्याच्या नावाखाली त्याने अनेकांकडून लाखो रुपये उकळले होते. देशभरात त्याच्याविरोधात फसवणुकीचे गुन्हे नोंदवण्यात आले होते. त्यामुळे विविध राज्यातील पोलिस त्याच्या मागावर होते. 


देशभरात गुन्हे दाखल

 गोरेगाव परिसरात मिलिंद येणार असल्याची माहिती खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजय सावंत यांना मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून त्याला अटक केली. लहाटेविरोधात मुंबई, पुणेसह दिल्ली, हरयाणा, गुरगाव या ठिकाणी फसवणुकीचे गुन्हे असल्याचे चौकशीतून स्पष्ट झालं आहे.



हेही वाचा -

मुंबई पोलिसांच्या हेल्पलाईनवरील तक्रारी १२० टक्क्यांनी वाढल्या

प्रियकराने 'तिचे' अश्लील फोटो टाकले फेसबुकवर




Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा