आंबोलीत ३ कोटींचे ड्रग्ज जप्त


आंबोलीत ३ कोटींचे ड्रग्ज जप्त
SHARES

आंबोली परिसरात अंमली पदार्थांच्या विक्रीसाठी आलेल्या दोन जणांना रविवारी आंबोली पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. मोहम्मद ईस्माईल गुलामहुसेन (४५) आणि दयानंद माणिक मुद्दानर (३२) अशी या आरोपींची नावे आहेत. या दोघांकडून पोलिसांनी 'इफिड्रीन' हे अंमली पदार्थ जप्त केले आहे. त्याची किंमत तब्बल ३ कोटी ४५ हजार ७४० रुपये इतकी आहे.  


२० किलो इफिड्रीन

मोहम्मद ईस्माईल गुलामहुसेन आणि दयानंद माणिक मुद्दानर हे ३१ डिसेंबरच्या निमित्तानं मुंबईत अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी हैद्राबाद येथून घेऊन येत होते. आंबोली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दया नायक यांना दोन इसम मुंबईत येत असल्याची माहिती मिळली असता त्यांनी अगरवाल इस्टेट रोड येथे सापळा रचला. यावेळी मध्यरात्री २.२० च्या सुमारास दोघांना अटक केली. या दोघांकडून पोलिसांनी २० किलो ३४८ ग्रॅम वजनाचे 'इफिड्रीन' जप्त केले अाहे.




Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा