कार झाडावर आदळल्याने 3 जण ठार

माळशेज घाटातील भोरेगावजवळ कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आणि काही खाद्यपदार्थांच्या स्टॉलवर आदळल्याने तीन जणांचा मृत्यू झाला.

कार झाडावर आदळल्याने 3 जण ठार
SHARES

माळशेज (malshej) घाटातील भोरेगावजवळ कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आणि काही खाद्यपदार्थांच्या स्टॉलवर आदळल्याने (crashed) 3 जणांचा मृत्यू झाला.

तसेच या अपघातात (accident) तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, अपघात झाला तेव्हा चालकासह वाहनातील सर्व लोक मद्यधुंद अवस्थेत होते आणि ते एका पार्टीतून परतत होते. हा ग्रुप कल्याणहून भीमाशंकरला (bhimashankar) जात असताना हा अपघात झाला.

भोरांडे गाव परिसरात भरधाव कार रस्त्यावरून पलटी होऊन झाडावर आदळली. या अपघातात चालकासह तीन तरुणांचा मृत्यू झाला आणि अन्य तीन जण गंभीर जखमी झाले. याप्रकरणी टोकावडे पोलीस ठाण्यात मयत चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अश्विन भोईर, नरेश मधुकर म्हात्रे आणि प्रतीक चोरगे अशी मृतांची नावे आहेत. वैभव मधुकर म्हात्रे, शिवाजी पुंडलिक घाडगे आणि अक्षय घाडगे अशी जखमींची नावे आहेत, तिघेही 30 वर्षांचे आहेत. त्यांना सुरुवातीला मुरबाड उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र नंतर त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना खासगी रुग्णालयात हलवण्यात आले.

नरेश म्हात्रे हे शिवसेनेचे कल्याण विभागाचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांचे पुतणे होते. अश्विन भोईर आणि नरेश म्हात्रे हे कल्याण (kalyan) पूर्वेतील चिंचपाडा येथील रहिवासी होते.

टोकावडे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनकर चकोर यांनी रात्री साडेदहाच्या सुमारास हा अपघात झाल्याची माहिती दिली. वाहनाचे नियंत्रण सुटले आणि ते रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळले आणि नंतर रस्त्याच्या कडेला असलेल्या खाद्यपदार्थांच्या स्टॉलवर आदळले, असे त्यांनी सांगितले.

कारच्या पुढील भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आणि त्यामुळे दोन प्रवाशांचा तात्काळ मृत्यू झाला. काही वेळातच प्रतीक चोरगे याचे निधन झाले. बचावलेल्या तीन जखमींवर उपचार सुरू आहेत.



हेही वाचा

चिंचपोकळी स्टेशनचा कायापालट होणार

महापालिकेच्या प्रयत्नांमुळे डेंग्यू, गॅस्ट्रोच्या रुग्णांमध्ये घट

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा