वेदनादायक! मुंबईत २४ तासात ३ पोलिस कर्मचाऱ्यांचा कोरोनाने मृत्यू

मुंबईत सहाय्यक उपनिरीक्षकासह तीन पोलिसांचा गुरूवारी कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या दोन आठवड्यात मुंबईत १५ पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

वेदनादायक!  मुंबईत २४ तासात ३ पोलिस कर्मचाऱ्यांचा कोरोनाने मृत्यू
SHARES

कोरोनाच्या संकटात अहोरात्र झटणाऱ्या पोलिसांमध्ये या विषाणूचा संसर्ग झपाट्याने होत असून, राज्यात कोरोनाबाधित पोलिसांचा आकडा आता ९९१ (अक्टीव रुग्ण) वर जाऊन पोहचला आहे. कोरोना या संसर्ग रोगाने गुरूवारी २४ तासात मुंबई पोलिस दलातील ३ पोलिसांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाने मृत्यू झालेल्या पोलिसांचा आकडा हा ५७ वर जाऊन पोहचला आहे. त्यात सर्वाधिक म्हणजे मुंबई पोलिस दलातील ३७ शहिद पोलिसांची संख्या आहे.

हेही वाचाः- Mumbai Police to hold flag march मालाडच्या आप्पापाडा परिसरात पोलिस आयुक्त ध्वजमार्च काढणार

राज्यातील पोलिस दलात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत दिवसेंदिवस वाढत आहे. आतापर्यंत राज्यातील ४१०० पोलिसांना कोरोनाची बाधा झाल्याची धक्कादायक माहिती आहे. त्यातील बहुसंख्य पोलिसांनी कोरोनावर मात केली असून सध्या ९९१  पोलिस सध्या उपचार घेत आहेत. माञ पोलिसांमध्ये कोरोनाचा हा प्रादुर्भाव फक्त आणि फक्त बेजबाबदार नागरिकांमुळे वाढत आहे. लॉकडाउनबाबत लोक आज ही गांभीर दिसत नाही. बाजारात गर्दी करणे, विनाकारण घराबाहेर पडणे, सुरक्षित वावरचा विसर असे प्रकार सर्वच ठिकाणी घडत आहेत. नियम मोडणाऱ्यांवर कारवाईचे काम मात्र पोलिसांना करावे लागत आहे. नियम मोडणाऱ्यांची चौकशी, त्यांच्यावर गुन्हे दाखल करणे, कागदपत्रे बनविणे अशी कामे करताना पोलिसांचा त्यांच्याशी थेट संपर्क येतो. यामुळे पोलिसांना करोनाची लागण झपाट्याने होत आहे. मुंबईत सहाय्यक उपनिरीक्षकासह तीन पोलिसांचा गुरूवारी कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या दोन आठवड्यात मुंबईत १५ पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

हेही वाचाः- CBSC Exams : बोर्डाच्या दहावी-बारावीच्या परीक्षा रद्द

गिरगाव येथे वास्तव्यास असलेले ५५ वर्षीय पोलिस उपनिरीक्षक सध्या मरीन ड्राइव्ह पोलिस ठाण्यात कार्यरत होते. त्याचे वय ५५ वर्षाहून अधिक असल्यामुळे ते सुट्टीवर होते. अशातच त्यांना थकवा आणि अशक्तपणा जाणवू लागल्यामुळे त्यांना १४ जून रोजी तातडीने सेव्हन हिल्स रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र त्यांचा गुरूवारी सकाळी कोरोनाने मृत्यू झाला.  त्यांच्या पश्चात पत्नी व चार मुली असा परिवार आहे. तर समता नगर पोलिस ठाण्यातील ५४ वर्षीय  पोलिस हवालदाराचाही कोरोनामुळे मृत्यू झाला. ते गुरूनानक रुग्णालयात उपचार घेत होते. १३ जूनपासून ते सुटीवर होते. १९ जूनला ते आजारी झाले होते. २४ जूनला त्यांची तब्येत सुधारली होती. त्यावेळी कुटुंबिय व सहका-यांसोबत त्यांनी व्हिडीओ कॉलद्वारे संभाषणही केले होते. पण गुरूवारी सकाळी त्यांची तब्येत अचानक बिघडली आणि त्याचा मृत्यू झाला. ते दहिसर पोलिस वसाहतीत वास्तव्यास होते. त्याच्या पश्च्यात पत्नी, मुलगा, सून व मुलगी असा परिवार आहे. तसेच दादर येथे ही ५४ वर्षीय  पोलिस हवालदाराचा कोरोनामुळे मृत्यू झाला. ते हिंदुजा रुग्णालयात उपचार घेत होते. माहिम येथील पोलिस वसाहतीत वास्तव्याला असलेल्या या पोलिस कर्मचा-याला उच्च रक्तदाबाचा त्रास होता. २५ मे ला त्यांना कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले होते.

हेही वाचाः- Salons open: २८ जूनपासून सलून सुरू, फक्त केसच कापणार

 मुंबईतील २५५० पोलिसांना कोरोनाची लागण झाली असून त्यातील १७५० पोलिसांनी कोरोनावर मात केली आहे. ६९२ पोलिस सध्या कोरोनावर उपचार घेत आहेत. राज्य पोलिस दलातील ४१०० पोलिसांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील बहुसंख्या पोलिसांनी कोरोनावर मात केली असून सध्या ९९१ पोलिस सध्या उपचार घेत आहेत. मुंबईतील कोरोनावर उपचार घेणा-या पोलिसांसाठी कोविड केअर सेंटर उभारण्यात आली आहेत. याशिवाय हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. पोलिस यंत्रणेकडून रेमदेसीवीर व टॉसिलिझ्युमॅब सारखी औषधीही तात्काळ उपलब्ध करून देण्यात आली आहेत. पण त्यानंतरही गेल्या दोन आठवड्यात १५ पोलिसांचा मृत्यू झाल्याने पोलिस दलात चिंतेचे वातावरण आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा