चेंबूरमध्ये नाल्यात पडून चिमुकल्याचा मृत्यू

गुरूवारी सकाळपासूनच मुंबईत पावसानं जोर पकडला असून ठिकठिकाणी पाणी साचलं आहे. तर अनेक ठिकाणचे नाले दुथडी भरून वाहत आहेत. अशात चित्ता कॅम्प परिसरात राहणार एहसान दुपारी एकच्या सुमारास पावसात भिजण्यासाठी घरातून बाहेर पडला. पावसात भिजत असताना एहसानचा पाय घसरला आणि तो घरासमोरील दीड ते २ फूट रूंदीच्या नाल्यात पडला.

चेंबूरमध्ये नाल्यात पडून चिमुकल्याचा मृत्यू
SHARES

चेंबूरच्या चित्ता कॅम्प येथील नाल्यात पडून गुरूवारी दुपारी एका ३ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. एहसान परवेझ तांबोळी असं या मुलाचं नाव असून त्याला गोवंडीच्या शताब्दी रूग्णालयात नेलं असता त्याला डाॅक्टरांनी मृत घोषित केलं. 

पाय घसरून नाल्यात पडला

गुरूवारी सकाळपासूनच मुंबईत पावसानं जोर पकडला असून ठिकठिकाणी पाणी साचलं आहे. तर अनेक ठिकाणचे नाले दुथडी भरून वाहत आहेत. अशात चित्ता कॅम्प परिसरात राहणार एहसान दुपारी एकच्या सुमारास पावसात भिजण्यासाठी घरातून बाहेर पडला. पावसात भिजत असताना एहसानचा पाय घसरला आणि तो घरासमोरील दीड ते २ फूट रूंदीच्या नाल्यात पडला. 

तोपर्यंत उशीर झाला

एहसान नाल्यात पडल्याचं पाहताच स्थानिकांनी अग्निशमन दलाला बोलावलं. अग्निशमन दलाचे जवान पोहोचेपर्यंत एहसान वाहत खूपच पुढे गेला होता. अग्निशमन दलाच्या जवानांनी स्थानिकांच्या मदतीनं एहसानला बाहेर काढलं नि तातडीनं शताब्दी रूग्णालयात नेलं. पण तोपर्यंत बराच उशीर झाला होता, एहसानचा त्याआधीच मृत्यू झाला होता. 

जबाबदार कोण?

एहसानच्या मृत्यूसाठी मुंबई महापालिकेला जबाबदार धरलं जात आहे. एमआयएमच्या स्थानिक नगरसेवकांनी या प्रकरणी महापालिकेला जबाबदार ठरवलं असून या घटनेच्या चौकशीचीही मागणी होत आहे. या चिमुकल्याच्या मृत्यूमुळे पावसाळ्याआधी नाले साफसफाईचा दावा फोल ठरल्याचं म्हणत महापालिकेला आता टार्गेट केलं जात आहे.

हेही वाचा-

मुंबईकरांनो जपून, या दिवशी येणार हायटाईड

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा