'चिल्लर' वादातून हाणामारी

बोरीवली - लिंक रोडवरील पेट्रोल पंपावर आलेल्या दोन बाईक चालकांना बेदम मारहाण करण्यात आलीय. पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांनी या दोघांना लाथा बुक्यांनी मारहाण केलीय. तेही फक्त सुट्या पैशांसाठी. सोमवारी दुपारी दोन बाईक चालक पेट्रोल पंपावर आले. पेट्रोल भरून झाल्यावर एकाने 70 रूपयाच्या पेट्रोलसाठी 100 रूपये दिले. पण सुट्टे पैसे नसल्यानं पेट्रोल पंप कर्मचारी आणि चालकामध्ये वाद झाला आणि वादाचे रूपांतर मारामारीत झाले. विशेष म्हणजे पेट्रोल पंपावर हजर असलेले पोलिसही काही करू शकले नाही. या प्रकरणी एमएचबी पोलिसांनी पेट्रोल पंपावरील कर्मचारी आणि बाईक स्वारांविरोधात गुन्हा दाखल केलाय. तर यापैकी काहींना अटक करण्यात आलीय.

Loading Comments