दाटीवाटी परिसर असलेल्या 35 पोलिस ठाण्यांत उभारणार सँनिटायझेशन टनेल


दाटीवाटी परिसर असलेल्या 35 पोलिस ठाण्यांत उभारणार सँनिटायझेशन टनेल
SHARES
कोरोनाने संपूर्ण जगात थैमान घातले असताना, नागरिकांच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर असणाऱ्या पोलिसांच्या सुरक्षेसाठी गृहविभागाने मोठा निर्णय घेतला आहे. ज्या परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त आहे. त्या ठिकाणी पोलिसांच्या सुरक्षेसाठी सँनिटायझेशन टनेल उभारण्यात येणार आहे. सुरवातीला महत्वाच्या 35 पोलिस ठाण्यांबाहेर सॅनिटायझेशन टनेल उभारण्यात आले आहेत.



सध्या धारावी, गोंवडी, शिवाजीनगर, दादर, वांद्रे, वरळी या चार ठिकाणी टनेल उभारण्यात आले होते. त्यानंतर आता  35 ठिकाणी असे टनेल उभारण्यात आले आहे. या ठिकाणी कोरोनाशी लढण्यासाठी तयार केलेले पिपीटी किट घालुन एक पोलीस कर्मचारी या तंबुत येणा-या जाणा-या पोलीस अधिकारी-कर्मचारी अथवा नाकाबंदीत ताब्यात घेतलेल्या संशयीतावर सॅनिटायझेशनचा फवारा करीत आहे. जेणेकरुन कोरोनाच्या विषाणु कोणताही परिणाम न होता, व्यवस्थित काळजी घेता येईल. अशा प्रकारची व्यवस्था करण्यात आली आहे. शहरातील कोरोनाच्या संसर्गाने हजारी पार केली आहे. कोणत्याही वेळी लाॅकडाऊन वाढविण्यात येईल अशी परिस्थिती सध्या आहे. अशातच कोरोनाच्या संसर्गातुन यावर उपचार करणारे डॉक्टर देखील सुटले नाहीत. यामुळे पालिसांनी शहरांत हॉटस्पॉट असलेली कोरोनाबाधीत ठिकाणे तसेच गर्दीच्या ठिकाणी सॅनिटायझेशन तंबुची उभारणी करण्यात आली आहे.

 या सॅनिटायझेशन टनेलमुळे धारावीतील पोलिसांना तसेच अनेक नागरीकांना देखल मोठा दिलासा मिळण्यास सुरुवात झाली आहे. त्याचप्रमाणे, गोंवडी, शिवाजीनगर आणि दादर परिसरात देखील अशा पकारचे सॅनिटायझेशन तंबु उभारण्यात आले होते. त्याचा चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर आता 35 ठिकाणी असे टनेल भारण्यात आले आहेत. . गस्त घालून आलेले पोलिस स्थानकात जाण्यापूर्वी या सॅनिटायझेन टनेलमध्ये जातील. यातून होणा-या फवारणीच्या साहाय्याने पोलिस स्वतःला सॅनिटाइज करू शकतील. अहोरात्र मेहनत घेणा-या पोलिसांना प्रादुर्भावापासून वाचविण्यासाठी धारावी पोलिस स्थानकात सॅनिटायझेशन टनेल उभारण्यात आला आहे. त्याचप्रमाणे अशा प्रकारचे तंबु अनेक ठिकाणी उभारण्यात येणार असल्याची माहिती एका पोलीस अधिका-याने दिली
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा