प्रॉपर्टीच्या वादातून मुलीसमोर आईची दगडाने ठेचून हत्या

संपत्तीच्या वादातून चौघांनी एका महिलेची दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना विलेपार्लेत बुधवारी रात्री घडली. मयुरी घोलम असं या मृत महिलेचं नाव आहे. याप्रकरणी विलेपार्ले पोलिस ठाण्यात चार आरोपींविरोधात हत्येचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

प्रॉपर्टीच्या वादातून मुलीसमोर आईची दगडाने ठेचून हत्या
SHARES

संपत्तीच्या वादातून चौघांनी १९ वर्षाच्या मुलीसमोर तिच्या ४२ वर्षाच्या आईची दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना विलेपार्लेत बुधवारी रात्री घडली. मयुरी घोलम असं या मृत महिलेचं नाव आहे. याप्रकरणी विलेपार्ले पोलिस ठाण्यात चार आरोपींविरोधात हत्येचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.


संपूर्ण प्रकार

विलेपार्लेच्या मालवी रोडवरील चिखलवाडीमध्ये मयुरी या त्यांची १९ वर्षाची मुलगी मिताली घोलम हिच्यासोबत राहतात. मयुरीच्या शेजारीच त्यांचे नातेवाईक महेंद्र गोरूले आणि संदीप गोरूले राहतात. मयुरी आणि गोरूले यांच्यामध्ये पूर्वजांच्या संपत्तीवरून वाद सुरू होते. यावरून मयुरी घोलम आणि गोरूले कुटुंबियांमध्ये वारंवार खटके उडायचे. 

दरम्यान बुधवारी रात्री याच संपत्तीच्या वादातून दोन्ही कुटुंबियांमध्ये वाद झाला आणि हा वाद विकोपाला गेला. याच वादातून संदीप गोरूले आणि त्यांची पत्नी इंदु आणि महेंद्र गोरूले आणि त्यांची पत्नी सोनल यांनी मितालीच्या घरात घुसून मयुरी यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी मिताली हिने तिच्या आईला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र मयुरी यांना वाचवण्यात ती अपयशी ठरली. त्या चौघांनीृ पेव्हर ब्लॉकने मयुरी यांना ठेचत होते. त्या बेशुद्ध पडल्यानंतरही ते चौघे मयुरी यांना काठीने मारहण करत होते.


हत्येचा गुन्हा दाखल

रक्ताच्या थारोळ्यात मयुरी निपचित पडलेली पाहून चौघांनी काढता पाय घेतला. त्यावेळी मितालीने शेजारच्यांची मदत घेत मयुरी यांना तातडीने जवळच्या शासकीय रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी मयुरी यांना तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी मितालीने दिलेल्या तक्रारीनुसार विलेपार्ले पोलिसांनी त्या चारही आरोपींविरोधात हत्येचा गुन्हा नोंदवला असून या चौघांचाशी शोध सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा