गोरेगावमध्ये ४ वर्षाच्या मुलीवर बलात्कार

 Goregaon
गोरेगावमध्ये ४ वर्षाच्या मुलीवर बलात्कार
गोरेगावमध्ये ४ वर्षाच्या मुलीवर बलात्कार
See all

गोरेगाव - गोरेगाव पश्चिम भगतसिंहनगर मध्ये राहणाऱ्या ४० वर्षाच्या व्यक्तीनं ४ वर्षाच्या मुलीला चॉकलेटचं आमिष दाखवून बलात्कार केला आहे. आरोपीला बांगुरनगर पोलिसांनी अटक केलं असुन कोर्टानं त्याला कलम ३७६ अंतर्गत शिक्षा सुनावून त्याला पोलीस कोठडीत ठेवण्यात आलं आहे. भगतसिंह नगरच्या नागरिकांनी आणि नगरसेविका प्रमिला शिंदे यांनी वरिष्ट अधिकारी संतोष भंडारे यांना पत्र देऊन गुन्हेगाराला फाशीची शिक्षा द्यावी ही मागणी देखील केली आहे.

रविवारी मुलगी घरा बाहेर फटाके फोडत होती. शेजारी राहणारा आरोपी आनंद मोहंतो (४०) या नराधमाने मुलीला दुपारच्या वेळेत कोणी नसल्याचा फायदा घेऊन चॉकलेटचे आमिष दाखवले आणि घरी नेले. मग तिच्यावर अत्याचार केला. मुलगी आवाज करेल म्हणून तिच्या तोंडात कपड्याचा बोळा भरला. मुलगी बेशुद्ध झालेली पाहता आनंद तिला सोडुन पळुन गेला. घडलेला सर्व प्रकार मुलीनं घरी जाऊन पालकांना सांगितला. त्यानंतर पालकांनी मुलीला कूपर रुग्णालयात दाखल केलं. डॉक्टरांनी मुलीची प्रकृती स्थिर असल्याचं सांगितलं. स्थानिकांनी आरोपीला चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केलं.

Loading Comments