वरळीत रक्ताच्या थारोळ्यात महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ


वरळीत रक्ताच्या थारोळ्यात महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ
SHARES

मुंबईच्या वरळी परिसरात एका ४४ वर्षीय महिलेची निर्घूण हत्या केल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली आहे. शिखा नारायण मंडल असे या महिलेचे नाव आहे. वरळीच्या जीबी खेर मार्गावरील तात्पुरत्या लेबर कॅम्पच्या पत्र्याच्या कंम्पाऊडमध्ये तिचा मृतदेह आढळून आला. या प्रकरणी वरळी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलिस अधिक तपास करत आहेत.

हेही वाचाः- मनसे- अॅमेझॉन वादात फ्लिपकार्टची बाजी, ग्राहकांना दिला मराठीचा पर्याय

वरळीच्या जीबी खेर मार्गावरील तात्पुरत्या लेबर कॅम्पच्या पत्र्याच्या कंम्पाऊडमध्ये शिखा ही रहात होती. गुरूवारी रात्री शिबु भौमिक ह्याच्यासोबत तिला शेवटचे अनेकांनी पाहिले होते. त्यानंतर गुरूवारी सायंकाळी शिखाही रक्ताच्या थारोळ्यात  लेबर कॅम्पच्या पत्र्याच्या कंम्पाऊडमध्ये आढळून आली. याची माहिती स्थानिकांनी पोलिस नियंत्रण कक्षाला दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. शिखाच्या गळ्याभोवती एक वर्ण आढळून आला आहे. तसेच तिच्या नाकावर आणि कपाळावर बोथट हत्याराने वार केले होते. शिखाला तातडीने नायर रुग्णालयात नेले असता. तिचा मृत्यू झाला असल्याचे डाँक्टरांनी घोषीत केले. शिखाच्या हत्येचे कारण अद्याप पुढे आले नसून पोलिसांनी संशयित आरोपी शिबु भौमिक विरोधात ३०२ भा.द.वि कलमांसह गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलिस शिबुचा शोध घेत आहेत.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा