Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
59,17,121
Recovered:
56,54,003
Deaths:
1,12,696
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
15,390
575
Maharashtra
1,47,354
9,350

मनसे- अॅमेझॉन वादात फ्लिपकार्टची बाजी, ग्राहकांना दिला मराठीचा पर्याय

फ्लिपकार्टनं मराठीचा पर्याय ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिला आहे.

मनसे- अॅमेझॉन वादात फ्लिपकार्टची बाजी, ग्राहकांना दिला मराठीचा पर्याय
SHARES

मराठी मुद्द्यावरून मनसे आणि अॅमेझॉनमध्ये वाद सुरू आहेत. आता हा वाद न्यायालयात देखील गेला आहे. पण आता या वादात अॅमेझॉनची मुख्य स्पर्धक कंपनी फ्लिपकार्टनं बाजी मारली आहे.

फ्लिपकार्टवर याआधी इंफ्लिपकार्टनं मराठीचा पर्याय ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिला आहे.ग्लिश, हिंदी, तेलगु, तामिळ आणि कनाडा या भाषा पर्याय म्हणून देण्यात आल्या होत्या. पण मराठी भाषेचा पर्याय नव्हता. पण मनसे आणि अॅमेझॉनचा वाद पाहता फ्लिपकार्टनं मराठी भाषेचा पर्याय आता ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिला आहे. मराठीसोबत बंगाली भाषेचा देखील पर्याय लवकरच उपलब्ध होणार आहे.


काही महिन्यांपूर्वी ट्विटरवर अनेकांनी फ्लिपकार्टवर मराठी भाषेचा पर्याय देण्याची मागणी केली होती. यावर कंपनीनं लवकरच यावर काम सुरू करणार असल्याचं म्हटलं होतं. त्यानुसार फ्लिपकार्टनं मराठी भाषेचा पर्याय ग्राहकांना दिला आहे. 

मनसेच्या मराठीच्या आग्रहावर अॅमेझॉननं काही दिवसापूर्वी आपण मराठीचा वापर करु शकत नसल्याचं सांगितलं होतं. त्यावरुन मुंबईभर मनसेनं 'नो मराठी नो अॅमेझॉन' असे पोस्टर्स लावले होते. चेंबूर परिसरातील काही बस स्थानकावरच्या आणि बसवरच्या अॅमेझॉनच्या जाहिराती मनसेच्या कार्यकर्त्यांनी फाडल्याची घटना घडली.

मनसेनं मराठीच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतल्यानंतर अॅमेझॉननं हा प्रश्न न्यायालयात नेला आहे. दिंडोशी न्यायालयानं या प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना नोटीस पाठवली आहे. न्यायालयानं राज ठाकरे यांना ५ जानेवारी २०२१ रोजी न्यायालयात व्यक्तिगतरित्या उपस्थित रहावं असं समन्स बजावलं आहे.

त्यानंतर शुक्रवारी मनसे कार्यकर्त्यांनी मुंबईतल्या आणि पुण्याच्या अॅमेझॉन कार्यालयाची तोडफोड केली. पुण्यामध्ये याप्रकरणी काही कार्यकर्त्यांना देखील अटक केली आहे. येत्या काळात मनसे-अॅमेझॉन वाद चांगलाच तापेल यात काही शंका नाही.  हेही वाचा

पेन्शन धारकांना दिलासा, हयात प्रमाणपत्र सादर करण्याच्या मुदतीत वाढ

2020 Year Ending : या '१०' घटनांमुळे २०२० हे वर्ष गाजलं

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा