Advertisement

2020 Year Ending : या '१०' घटनांमुळे २०२० हे वर्ष गाजलं

While the year had a promising start, the world was soon grappling with the coronavirus. Mumbai, on the other hand, had several notable moments throughout 2020.

SHARES
01/10
2020 Year Ending :  या '१०' घटनांमुळे २०२० हे वर्ष गाजलं
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहराज्यमंत्री अमित शहा यांच्याविरोधात घोषणा देऊन हजारो लोकांनी सीएए-एनआरसी-एनपीआरचा निषेध करण्याचा निर्णय घेतला.
02/10
2020 Year Ending :  या '१०' घटनांमुळे २०२० हे वर्ष गाजलं
२०१९ मध्ये चीनच्या वुहानमध्ये पहिल्यांदा ओळखला गेलेला COVID 19 हा आजार जगभर पसरला. अजून देखील जग या जिवघेण्या व्हायरसचा सामना करत आहे. आतापर्यंत जगभरात अनेक जणांचा या व्हायरमुळे मृत्यू झाला आहे. लवकरच कोरोनावरील लस सर्वसामान्यांना देण्यात येईल.
03/10
2020 Year Ending :  या '१०' घटनांमुळे २०२० हे वर्ष गाजलं
१६ एप्रिल २०२० रोजी, महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील गडचिंचले गावमध्ये एका गटानं दोन हिंदू साधूंचं संशयातून मॉब लिंचिंग केलं होतं. यात त्या साधूंचा मृत्यू झाला. मुल पळवणारी टोळीपरिसरात सक्रिय असल्याचा मेसेज सर्वत्र पसरला. याच गैरसमजातून साधूंची हत्या केली गेल्याचं समोर आलं.
04/10
2020 Year Ending :  या '१०' घटनांमुळे २०२० हे वर्ष गाजलं
१४ जून रोजी ३४ वर्षीय अभिनेता सुशांत सिंग राजपूतनं आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येस बॉलिवूडमधील घराणेशाही कारणाभूत असल्याचा आरोप होऊ लागला. यात अनेक अभिनेते आणि अभिनेत्रीची नावं जोडली गेली. सुशांतची गर्लफ्रेंड रीया चक्रवर्तीवर देखील अनेक आरोप झाले. या प्रकरणाला पुढे ड्रग तस्करीचे वळण आले. यात अनेक बॉलिवूड कलाकारांची नावं समोर आली.
05/10
2020 Year Ending :  या '१०' घटनांमुळे २०२० हे वर्ष गाजलं
चक्रीवादळ निसर्गाच्या रोषापासून मुंबई बचावली. पण अलिबागकरांना वादळी पावसाचा सामना करावा लागला. अलिभागसोबतच ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, नाशिक इथं देखील चक्रिवादळ धडकले. यात अनेक नागरिकांच्या घरांचं नुकसान झालं.
06/10
2020 Year Ending :  या '१०' घटनांमुळे २०२० हे वर्ष गाजलं
कोरोना काळात NEET आणि मुंबई विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणावरून राज्यपाल भगतसिंग कोशियारी आणि राज्य सरकारमध्ये वाद झाल्याची चर्चा देखील रंगली होती.
07/10
2020 Year Ending :  या '१०' घटनांमुळे २०२० हे वर्ष गाजलं
१५ सप्टेंबर रोजी कंगना रणौतनं बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विरोधात २ कोटी रुपयांचा दावा दाखल केला. मुंबईतील पाली हिल इथल्या तिच्या कार्यालयावर पालिकेनं हातोडा मारला होता. यात तिचं २ कोटीचं नुकसान झालं. या नुकसान भरपाईची मागणी करण्यासाठी तिने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
08/10
2020 Year Ending :  या '१०' घटनांमुळे २०२० हे वर्ष गाजलं
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात मेट्रो कार शेड आरे इथून कांजूरमार्गला हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे भाजप नेत्यांनी राज्य सरकारला फटकारले. आता उच्च न्यायालयानं देखील कांजूरमार्ग इथल्या कार शेडचं काम थांबवण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे ठाकरे सरकारच्या बैठकांवर बैठका सुरू आहेत.
09/10
2020 Year Ending :  या '१०' घटनांमुळे २०२० हे वर्ष गाजलं
रिपब्लिक टीव्ही एडिटर-इन-चीफ यांना सन २०२० मध्ये इंटीरियर डिझायनर अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी अटक केली होती. २०१८ मधील हे प्रकरण आहे.
10/10
2020 Year Ending :  या '१०' घटनांमुळे २०२० हे वर्ष गाजलं
नवीन कृषी कायद्याविरोधात हजारो शेतकरी ऐकवटले आहेत. गेले काही महिने ते आंदोलनावर आहेत. नवीन ३ कृषी कायदे मागे घ्यावेत अशी या शेतकऱ्यांची मागणी आहे.
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा