Advertisement

पेन्शन धारकांना दिलासा, हयात प्रमाणपत्र सादर करण्याच्या मुदतीत वाढ

पेन्शन धारकांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. पेन्शन धारकांना हयातीचा दाखला जमा करण्याची तारीख वाढवण्यात आली आहे.

पेन्शन धारकांना दिलासा, हयात प्रमाणपत्र सादर करण्याच्या मुदतीत वाढ
SHARES

पेन्शन धारकांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. पेन्शन धारकांना हयातीचा दाखला जमा करण्याची तारीख वाढवण्यात आली आहे. आता पेन्शन धारकांना हयातीचा दाखला २८ फेब्रुवारीपर्यंत देता येणार आहे. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी यासंदर्भात माहिती दिली.

पेन्शन धारकांना दरवर्षी नोव्हेंंबरमध्ये हयात प्रमाणपत्र सादर करणं अनिवार्य असते. प्रमाणपत्र सादर न केल्यास त्यांची पेन्शन रद्द होऊ शकते. कोरोना काळात ज्येष्ठ नागरिकांना बाहेर पडणे कठीण होते. अशावेळी बँकेत उपस्थित राहून ओळखपत्र दाखवून सही करणे किंवा ठसे देणे शक्य नव्हते. त्यामुळे अनेक ज्येष्ठ नागरिकांनी बाहेर पडणे टाळले.

त्यामुळे ३१ डिसेंबरपर्यंत हयात प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत आधी दिली होती. ही मुदत आता वाढवून केंद्र सरकारने पेन्शनधारकांना दिलासा दिला आहे. त्यांना आपले हयात प्रमाणपत्र फेब्रुवारीपर्यंत सादर करण्यात येणार आहे.



हेही वाचा-

महिला रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी 'स्मार्ट सहेली' योजना

मुंबई-ठाण्यात पोलिसांची संचारबंदी



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा