राजस्थानवरून मुंबईत हेरॉईन विकण्यासाठी आलेल्या टोळीचा पर्दाफाश

राजस्थानवरून मुंबईत हेरॉईन विकण्यासाठी आलेल्या टोळीचा नालासोपारा पेल्हार परिसरात मुंबई आणि ठाणे पोलिसांनी भांडाफोड केला आहे.

राजस्थानवरून मुंबईत हेरॉईन विकण्यासाठी आलेल्या टोळीचा पर्दाफाश
SHARES

राजस्थानवरून मुंबईत हेरॉईन विकण्यासाठी आलेल्या टोळीचा नालासोपारा पेल्हार परिसरात मुंबई आणि ठाणे पोलिसांनी भांडाफोड केला आहे. आलीम मोहम्मद आक्तर (४६), छोटा मोहम्मद नासिर (४०) असं अटक केलेल्या आरोपींची नाव आहेत. या टोळीकडून ५ करोड १७ लाख रुपये किमतीचा १ हजार ७२४ ग्रॅम हेरॉईन नावाचा अमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे. त्यांच्या सोबत २ लाख ६० हजार रोख, २ मोबाईल फोन व अमली पदार्थ विक्रीसाठी लागणारे काही साहित्य जप्त केले आहे.

मुंबईच्या जुहू आणि ठाणे येथील दहशतवाद विरोधी पथकाने शुक्रवारी नालासोपारा पेल्हार भागात ही कारवाई केली असून यात २ आरोपींना मुद्देमालासह पकडण्यात यश आले आहे.

या दोन्ही आरोपीना न्यायालयाने १५ फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती दहशतवादी विरोधी पथकाने रविवारी दिली. याबाबत दहशतवाद विरोधी पथक ठाणे, मुंबई येथे कलम ८ (क), २१ (क), २९ अंमलीपदार्थ विरोधी कायदा 1985 अन्वेय गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आलीम मोहम्मद आक्तर, छोटा मोहम्मद नासिर हे दोन्ही आरोपी उत्तराखंड राज्यातील हरिद्वार जिल्ह्यातील एका खेड्यातील रहिवासी असून, वसई तालुक्याक्याच्या नालासोपारा पेल्हार गावातील एका भाड्याच्या रूम मध्ये राहून अमली पदार्थाचा व्यवसाय करत होते.

महाराष्ट्राचे दहशतवाद विरोधी पथक प्रमुख विनीत अग्रवाल, पोलीस अधीक्षक डॉ राजकुमार शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त सिध्देश्वर गोवे, यांच्या मार्गदर्शनाखालीला मुंबईच्या जुहू युनिटचे प्रभारी ज्ञानेश्वर वाघ, एपीआय दशरथ विटकर, सचिन पाटील व ठाणे दहशतवाद विरोधी पथकाचे अविनाश कवठेकर, संजीव भोसले यांना मिळाल्या नंतर त्यांनी सापळा रचून शुक्रवारी छापा मारून अंमली पदार्थ विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे.

नवीन बुटाची जोडी घेऊन, बुटाचे सोल आतून कापून, त्यामध्ये निर्माण झालेल्या जागेमध्ये, अम्लीपदार्थ ठेवून, सदर बुटाची जोडी त्याच्या हस्तकामार्फत राजस्थान मधून मुंबईत पाठवत होता. दोन्ही अटक आरोपी हे त्यांच्या तिसऱ्या साथीदारांसह पेल्हार गावातील भाडे तत्त्वावरील घरात राहून तेथून मुंबईतील किरकोळ विक्रेत्यांना अमली पदार्थ पुरवीत होते. सदर अटक आरोपींचा तिसरा साथीदार याला देखील गुन्ह्यात पाहिजे आरोपी म्हणून दर्शविण्यात आले असून पोलीस त्याचा तपास करीत आहेत.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा