भायखळ्यात स्लॅब कोसळून महिला जखमी


भायखळ्यात स्लॅब कोसळून महिला जखमी
SHARES

भायखळ्यातील अब्दुल मेन्शन इमारतीतील घराचा स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेत शुक्रवारी सायंकाळी एक महिला जखमी झाली. या महिलेचं नाव परवीन हुसेन खान (५०) असं असून तिच्यावर नायर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


कशी घडली घटना?

भायखळ्यातील ४० वर्षे जुन्या अब्दुल मेन्शन इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर परवीन खान आपल्या कुटुंबासहित राहतात. शुक्रवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास परवीन घरात असताना घरातील छताचा काही भाग अचानक परवीन यांच्या डोक्यात पडला.

ही दुर्घटना घडताच घरातील इतर सदस्यांनी परवीन यांना उपचारासाठी तातडीने नायर रुग्णालयात दाखल केलं. परवीन यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती नायर रुग्णालयाने दिली.



हेही वाचा-

गँगस्टर गुरू साटमचे ५ हस्तक जेरबंद

कल्याणमध्ये खड्ड्याचा आणखी एक बळी



Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा