धक्कादायक! मुंबईत मुलींच्या अपहरणात वाढ

मुंबईत गेल्या ५ वर्षात १८ वर्षांखालील व १८ वर्षांवरील मुलींच्या अपहरणाचं आणि हरवण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. गेल्या ५ वर्षांत १८ वर्षांखालील एकूण ५०५६ तर १८ वर्षांवरील एकूण २१,६५२ मुलींच्या अपहणाच्या आणि हरवण्याच्या घटना घडल्या आहेत.

धक्कादायक! मुंबईत मुलींच्या अपहरणात वाढ
SHARES

मुंबईत गेल्या ५ वर्षांमध्ये मुली आणि महिला हरवण्याच्या तसंच अपहरणाच्या प्रमाणात वाढ झाल्याची धक्कादायक माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. मुख्यमंत्र्यांनी सादर केलेल्या आकडेवारीमुळे मुंबईतील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आल्याचं दिसत आहे.


आकडेवारी 'अशी'

मुंबईत गेल्या ५ वर्षात १८ वर्षांखालील व १८ वर्षांवरील मुलींच्या अपहरणाचं आणि हरवण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. गेल्या ५ वर्षांत १८ वर्षांखालील एकूण ५०५६ तर १८ वर्षांवरील एकूण २१,६५२ मुलींच्या अपहणाच्या आणि हरवण्याच्या घटना घडल्या आहेत.


कशासाठी अपहरण?

या मुलींचं अपहरण करून त्यांना भीक मागायला लावलं जात होतं. याप्रकरणी २०१३ ते २०१७ या कालावधीत आरोपी विरोधात ३ गुन्हे देखील दाखल करण्यात आले आहेत. तसंच, मुलींचा अनैतिक कृत्यासाठी वापर केल्याप्रकरणी ११ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.



किती मुली सापडल्या?

मुंबईत २०१३ साली १८ वर्षांखाली अपहरण झालेल्या मुलींची संख्या ९२ होती. हीच संख्या २०१४ साली १५०० वर पोहोचली. तर २०१७ साली ही संख्या १३६८ वर पोहोचली. मात्र, अपहरण झालेल्या ५०५६ मुलींपैकी ४७५८ मुली सापडल्या असून ३७० मुली अजूनही बेपत्ता आहेत.


बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातून हरवलेल्या, अपहरण झालेल्या मुली:

   

वर्ष१८ वर्षांखालील मुली
१८ वर्षांवरील महिला

हरवलेसापडलेहरवलेसापडले
२०१३ ९२७९४०४१३८२३
२०१४१५००१४७५४१७०३९४३
२०१५९२७८७८४३१५४०३९
२०१६११६९१०९१४५२७४०९६
२०१७१३६८१२३५४५९९३७८५
एकूण५०५६४७५८२१६५२१९६८६


       


हेही वाचा- 

मुंबईला टार्गेट करण्यासाठी नक्षलवाद्यांची नवी खेळी!

बलात्कार प्रकरणात मिमोह चक्रवर्तीला होणार अटक?


   
   
    

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा