मुंबईला टार्गेट करण्यासाठी नक्षलवाद्यांची नवी खेळी!

नक्षलवाद्यांना पैशांसाठी मदत करणाऱ्या एनजीओवर सरकारने टाच आणल्यानंतर नक्षलवाद्यांनी आता अंमली पदार्थाच्या तस्करीतून पैसे कमवण्याचा नवा मार्ग अवलंबल्याचं तपासात पुढं आलं आहे.

मुंबईला टार्गेट करण्यासाठी नक्षलवाद्यांची नवी खेळी!
SHARES

देशाची आर्थिक राजधानी मुंबईवर सध्या नक्षलवाद्यांच्या आत्मघाती कारवायांचं सावट घोंगावत असल्याने सुरक्षा यंत्रणांनी कडक पावले उचलण्यास सुरूवात केली आहे. नक्षलवाद्यांना पैशांसाठी मदत करणाऱ्या एनजीओवर सरकारने टाच आणल्यानंतर नक्षलवाद्यांनी आता अंमली पदार्थाच्या तस्करीतून पैसे कमवण्याचा नवा मार्ग अवलंबल्याचं तपासात पुढं आलं आहे.


अंमली पदार्थांचा मागोवा

मुंबईत येणाऱ्या अंमलीपदार्थांचा माग काढताना महसूल गुप्तवार्ता संचालनालया (डीआरआय) च्या अधिकाऱ्यांना हे अंमली पदार्थ नक्षलवाद्यांचा प्रभाव असलेल्या भागातून येत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार मुंबईच्या डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी छत्तीसगढ मधील रायपूर इथं नारळांची वाहतूक करणाऱ्या ट्रकवर कारवाई केली. या ट्रकमध्ये अधिकाऱ्यांना अंदाजे ५०० किलोचा गांजा आढळला.



'इथं' होते विक्री

त्यावेळी डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी चालक सुरजित सिंग रंधवा, क्लिनर अवतार सिंग आणि मालक धर्मराव यांना अटक केली. या तिघांच्या चौकशीतून हे सर्व अंमली पदार्थ नक्षलवाद्यांचे असल्याची त्यांनी कबुली दिली. हा गांजा उत्तरप्रदेश, राजस्थान, बिहार, मध्यप्रदेश येथे विक्रीसाठी नेत असल्याचं त्यांनी सांगितलं. या पूर्वीही त्यांनी अशाप्रकारे नक्षलवाद्यांसाठी गांजाची तस्करी केल्याची कबुली डीआरआयच्या अधिकाऱ्यांना दिली आहे.


अंमली पदार्थांची शेती

या प्रकरणाची डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी खोलवर चौकशी केली असता. या पूर्वी शहरात एनजीओ स्थापन करून त्या मार्फत मिळणारा पैसा नक्षलवादी चळवळीसाठी दिला जात असल्याचं लक्षात आल्यानंतर सरकारने बोगस एनजीओ संस्थांवर टाच आणली. शहरातून पैशांची आवक बंद झाल्याने शस्त्रसाठा आणि मूलभूत गरजांसाठी नक्षलवाद्यांनी प्रभाव असलेल्या जंगलातील जमिनींवर अंमली पदार्थांची शेती करण्यास सुरूवात केली.


५० ते १०० कोटींची उलाढाल

त्यानंतर अंमली पदार्थांची तस्करी करून मिळणाऱ्या पैशांचा उपयोग मूलभूत गरजा आणि शस्त्रसाठा खरेदीसाठी वापरण्यास सुरूवात केल्याचं आतापर्यंतच्या चौकशीतून पुढं आलं आहे. देशभरातील अंमली पदार्थांच्या तस्करीतून नक्षलवाद्यांना दरवर्षी ५० ते १०० कोटींची उलाढाल करत असल्याचा अंदाज अधिकाऱ्यांनी वर्तवला आहे. त्यामुळे डीआरआयने आता अंमली पदार्थ तस्करी करणाऱ्यांविरोधात कठोर भूमिका घेतली आहे.



हेही वाचा-

३ महिन्याचं बाळ पळवणारी महिला गजाआड

कुटुंब रंगलंय चोऱ्यांमध्ये!



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा