कुटुंब रंगलंय चोऱ्यांमध्ये!


कुटुंब रंगलंय चोऱ्यांमध्ये!
SHARES

मुंबईत कचरा वेचण्याच्या नावाखाली नागरिकांच्या घराची रेकी करून घरफोडी करणाऱ्या तिघांना नवघर पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे, या टोळीतील सर्वच सदस्यांची पार्श्वभूमी ही गुन्हेगारी वृत्तीची आहे. अटक आरोपींमध्ये दोन दांपत्य व घरातील एका सदस्याचा समावेश आहे. या तिघांना न्यायालयानं पोलिस कोठडी सुनावली आहे.


सीसीटीव्हीद्वारे अारोपींची अोळख

ठाणे येथील नवघर परिसरात राहणारे तक्रारदार हे जनकल्याण बँकेत मँनेजर या पदावर नोकरीला असून त्यांची पत्नी लक्ष्मीबाई हायस्कूलमध्ये शिक्षिका आहे. मे महिन्यात तक्रारदार उन्हाळ्याच्या सुट्टीनिमित्ता गावी गेले असताना अनोळखी चोरांनी त्यांच्या घरातून रोख रक्कम व मौल्यवान दागिन्यांसह दोन लाख ८४ हजार रुपये चोरले होते. याप्रकरणी तक्रारदारांनी नवघर पोलिसात तक्रार नोंदवली होती. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरू केला. पोलिसांना परिसरातील सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे ठाणे परिसरातून प्रकाश अंबादास अाव्हाड, त्यांची पत्नी पूजा आणि बहीण अनू अाव्हाड यांना अटक केली.


पत्नीने केल्या चोऱ्या

विशेष बाब म्हणजे, या सर्व चोऱ्या प्रकाशने केल्या नसून त्याची पत्नी आणि बहिणीने केल्या असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. प्रकाश यांचा कचरा वेचण्याचा व्यवसाय आहे. कचरा वेचण्याच्या नावाखाली बंद असलेल्या घरांची प्रकाश रेकी करायचा. बंद घरांची माहिती तो पत्नी पूजा आणि बहिण अनूला द्यायचा. त्यानंतर पूजा त्या घराचे कुलूप तोडून चोऱ्या करायच्या. विशेष म्हणजे पूजा ही चार महिन्यांची गरोदर असून तिच्यावर कुणी संशय घेतल्यास ती पोलिसांना विश्वासात घेण्यासाठी स्वत:ला इजा करून घ्यायची. त्यामुळे पोलिस तिच्याकडे दुर्लक्ष करायचे.


१५ गुन्ह्यांची नोंद

दरम्यान, मे महिन्यात पूजा चोरी करण्यासाठी आली होती, त्यावेळी शेजारच्यांनी तिला हटकले होते. मात्र साडी सुटल्यामुळे अापण घराचा अाडोसा घेतल्याचं कारण तिनं दिलं होतं. शेजारच्यांनीही तिच्यावर विश्वास ठेवला होता. पूजा आणि प्रकाश यांच्यावर चोरीच्या तब्बल १५ गुन्ह्यांची नोंद आहे. तर घरातील दोन मुले व बहिणीवरही चोरींच्या गुन्ह्यांची नोंद आहे. या संपूर्ण कुटुंबावरच चोरीच्या गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती नवघर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक भूषण भिसे यांनी दिली.


हेही वाचा -

मुंबईला फिरायला आलेल्या इटालियन महिलेवर बलात्कार

अतिरेक्यांना पैसे पुरवणाऱ्या रमेशला पुण्यातून अटक



Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा