३ महिन्याचं बाळ पळवणारी महिला गजाआड

२८ जून रोजी सिमा तिच्या ३ महिन्यांच्या मुलासह सीएसएमटी स्थानकावर फिरत असताना तिला सकाळी ८ च्या सुमारास शबाना भेटली. कित्येक महिन्यांनी भेटल्याने दोघींच्या गप्पा चांगल्याच रंगल्या. त्यावेळी सिमाच्या हातातील ३ महिन्यांचं बाळ शबानाच्या डोळ्यात भरलं. शबाना बाळ देण्यास तयार होणार नाही. त्यामुळे शबानाने स्मिताने बाळ पळवायचं ठरवलं.

३ महिन्याचं बाळ पळवणारी महिला गजाआड
SHARES

रेल्वे स्थानकावर अल्पवयीन मूलं पळवणाऱ्या ४० वर्षांच्या महिलेला दादर रेल्वे पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली. अमिना उर्फ शबिना उर्फ वल्ल्मपल्ली असं या महिलेचं नाव आहे. पळवलेली मूलं विकण्यासाठी पुण्याला गेलेली असताना पोलिसांनी तिला रंगेहात अटक केली.

सीएसटीच्या फूटपाथवर राहणारी सीमा मांजरेकर (३२) ही महिला रेल्वे फलाटावर छोट्या मोठ्या वस्तू विकण्याचां काम करते. ६ महिन्यांपूर्वी सीमाची ओळख शबिना हिच्याशी कुर्ला स्थानकावर लहान मुलांचं साहित्य विकताना झाली होती. दोघींमध्ये चांगली मैत्री झाली. पण त्यानंतर दोघी एकमेकींना कधी भेटल्या नाहीत.


बाळ मनात भरलं

दरम्यान २८ जून रोजी सीमा तिच्या ३ महिन्यांच्या मुलासह सीएसएमटी स्थानकावर फिरत असताना तिला सकाळी ८ च्या सुमारास शबाना भेटली. कित्येक महिन्यांनी भेटल्याने दोघींच्या गप्पा चांगल्याच रंगल्या. त्यावेळी सीमाच्या हातातील ३ महिन्यांचं बाळ शबानाच्या डोळ्यात भरलं. शबाना बाळ देण्यास तयार होणार नाही. त्यामुळे शबानाने सीमाने बाळ पळवायचं ठरवलं.


दुसरी लोकल पकडून पळ

त्यानुसार शबानाने सीमाला दादरला खरेदीसाठी येण्याचा आग्रह केला. त्यानुसार सीमाने शबानासोबत दादरला जाण्यासाठी लोकल पकडली. लोकलमध्ये प्रवास करत असताना अचानक बाळाने गुळणी टाकल्याने स्मिताचा ड्रेस खराब झाला. दादर स्थानकावर प्लॅटफाॅर्म क्रमांक २ वर दोघी उतरल्यानंतर सीमाने बाळाला शबानाजवळ दिलं आणि ती ड्रेस धुण्यासाठी शौचालयात गेली. त्याचवेळी प्लॅटफाॅर्मवर आलेली दुुुुसरी
लोकल पकडून शबानाने पळ काढला. शौचालयातून बाहेर आल्यानंतर सीमाने शबानाचा शोध घेतला. मात्र ती कुठेही दिसून आली नाही. अखेर सीमाने दादर पोलिसांत तक्रार नोंदवली.


सीसीटीव्हीत दिसली

या गुन्ह्यांची दखल घेत, दादर पोलिसांनी बाळाच्या शोधासाठी पथकं तयार केली. पोलिसांनी सीएसएमटीहून प्लॅटफाॅर्मचे सीसीटीव्ही फुटेज मिळवलं. मात्र फुटेजमध्ये शबानाचा चेहरा स्पष्ट दिसून येत नव्हता. २ दिवसाच्या अथक प्रयत्नानंतर शबाना पुण्याला पळून गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली.


पथकं रवाना

त्यानुसार एपीआय फारूख शेख पीएसआय प्रदीप होळगे, हेड काँन्स्टेबल शशिकांत लोंडे, दादासो लिंगाळे, राजेश बडाळे, विजय शिंदे आणि महिला पोलिस सुभक्ती घाडगे, संगिता चिकने यांचे पथक पुण्याला रवाना झाले. पुण्यात शबानाचा शोध घेतला असता. शबाना सोलापूरच्या पाशा पेठेत तिच्या घरी गेल्याचं कळालं. त्यानुसार पोलिस सोलापूरला गेले. मात्र शबानाच्या घराला टाळं होतं.


'अशी' केली अटक

त्यावेळी शबिना पुन्हा पुण्याच्या खडकीच्या पीएमटी बस स्टाँपवर येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून तिला अटक केली. बाळाच्या विक्रीसाठीच शबानाने त्याची चोरी केल्याचा संशय दादर रेल्वे पोलिसांना आहे. या प्रकरणी अधिक चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.



हेही वाचा-

पोलिसांच्या डोळ्यात माती फेकून पळ

कुटुंब रंगलंय चोऱ्यांमध्ये!



Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा