क्षुल्लक वादातून ५५ वर्षीय नागरिकांची विक्रोळीत हत्या, सात जणांना अट

परिसरात राहणाऱ्या या टवाळ पोरांशी काही महिन्यांपूर्वी त्याचा वाद झाला होता. याच भांडणाचा राग त्या मुलांच्या मनात होता.

क्षुल्लक वादातून ५५ वर्षीय नागरिकांची विक्रोळीत हत्या, सात जणांना अट
SHARES

विक्रोळीच्या कन्नमवार नगर परिसरात पूर्ववैमन्यसातून ५५ वर्षीय व्यक्तीची ७ आरोपींना हत्या केल्याची घटना गुरूवारी दुपारी ३ च्या सुमारास घडली. अंबादास साळवे असे या मृत व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी मृतांच्या कमल अंबादास साळवे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी सात आरोपींना अटक केली आहे.

हेही वाचा:- मुंबईच्या या भागातील रुग्णसंख्येत घट; स्थानिकांना दिलासा

विक्रोळीच्या कन्नमवार नगर परिसरात साळवे हे त्यांच्या कुटुंबियांसह मागील अनेक वर्षांपासून रहात आहेत. त्याच परिसरात राहणाऱ्या या टवाळ पोरांशी काही महिन्यांपूर्वी त्याचा वाद झाला होता. याच भांडणाचा राग त्या मुलांच्या मनात होता. दरम्यान गुरूवारी दुपारी ३ च्या सुमारास अॅक्सीस बँकेजवळ, कन्नमवार नगर १, येथून अंबादास हे कामावरून परतत होते. त्यावेळी या टवाळ मुलांनी त्यांची वाट अडवली. त्यावेळी दोघांमध्ये शाब्दीक वाद झाला. त्यानंतर अचानक या मुलांनी अंबादास यांना मारहाण करण्यास सुरूवात केली. या मारहाणीत अंबादास गंभीर जखमी झाले. त्यांना जवळील शासकिय रुग्णालयात नेले. मात्र डाँक्टरांनी अंबादास यांना तपासून मृत घोषीत  केले. या हत्येची माहिती मिळताच विक्रोळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी अंबादास यांच्या पत्नी कमल यांनी दिलेल्या तक्रारीवरून ३०२,१२०(ब),३२४,३२३,१४३,१४६,१४७,१४८,१४९,५०४,५०६ अंतर्गत गुन्हा नोंदवून सात जणांना अटक केली आहे. या प्रकऱणी पोलिस अधिक तपास करत आहेत.   

Read this story in हिंदी
संबंधित विषय