दिवसेंदिवस अल्पवयीन मुलींवर अत्याचार घडत असल्याच्या घटना कानावर येत असतानाच मुंबईच्या अॅन्टाॅप हिल परिसरात ७ वर्षाच्या मुलीवर अत्याचार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी एका अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.
हेही वाचाः- मुंबईत कोरोनाचे ९९८ नवे रुग्ण, २३ जणांचा दिवसभरात मृत्यू
अॅन्टाॅप हिलच्या बंगालीपुरा परिसरात अल्पवयीन ७ वर्षीय मुलगी आपल्या कुटुंबियांसोबत राहते. तर आरोपी अल्पवयीन मुलगा देखील शेजारीच राहतो. पीडित मुलीच्या घरची परिस्थिती हालाकीची असल्यामुळे तिचे आई व वडिल दोघंही कामाला जातात. त्यामुळे ७ वर्षीय अल्पवयीन मुलगीही घरी एकटीच असताना. आरोपीने मुलीला खेळण्यासाठी स्वतःच्या घरी बोलवून तिच्यावर अत्याचार करायचा. तसेच याबाबत कुणाला न सांगण्यासाठी धमकवायचा. मात्र वेदनांनी असह्य झालेल्या मुलीने अखेर या अत्याचाराची माहिती आपल्या आईला दिल्यानंतर हा प्रकार पुढे आला. पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.