लाँकडाऊन तोडणाऱ्यावर कारवाई, राज्यात 31 हजार तर मुंबईत 709 जणांच्या गाड्या जप्त


लाँकडाऊन तोडणाऱ्यावर कारवाई, राज्यात 31 हजार तर मुंबईत 709 जणांच्या गाड्या जप्त
SHARES

देशांत कोरोनाचे सुरु असलेले थैमान आटोक्यात आणण्यासाठी लॉकडाऊन सुरु केल्यानंतर देखील या लॉकडाऊनच्या नियमांचे सर्रासपणे उल्लंघन केले जात आहे. अशातच राज्यभरात31 हजार 296गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. पोलिसांनी या काळात एक कोटी 70 लाखांचा दंडही वसूल केला आहे. या काळात 46 हजार 671 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

 शहरात कोरोनाचा आकडा दिवसे-दिवस वाढत चालला आहे. याला आळा घालण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले आहे. पण अशा परिस्थितीतही लॉकडाऊनचे अनेक महाभागाकडुन उल्लंघन सुरु आहे. यामुळे पोलिसांनी राज्यभरात धडक कारवाई आणि नाकांबदी लावली आहे. खाजगी वाहनाना विना परवाना बाहेर फिरण्यास सक्त मनाई असताना देखील काही माथफिरु दुचाकी, चारचाकी घेऊन बाहेर फिरत आहेत.

अशातच, राज्याभरातून 31 हजार 296गाड्या गाड्या जप्त करण्यात आली आहे. त्या अंतर्गत एक कोटी 70 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आल आहे.  राज्यभरात पोलिसांवर हल्ल्याचे 97 प्रकरणं घडली आहे. त्यात 162 जणांना अटक करण्यात आली आहे. मुंबईत धारावी, गोवंडी परिसरात पोलिसांवर हल्ला झाल्याच्या घटना घडल्या होत्या. याशिवाय संचार बंदीच्या कालावधीत बाहेर फिरल्यााप्रकरणी राज्यभरात 46 हजार 671 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.  कलम 144 चे उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.

मुंबईतही 709 वाहने जप्त 

मुंबईतील अवैधरित्या वाहन बाहेर काढल्याप्रकरणी 709गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. उत्तर मुंबईत सर्वाधीत म्हणजे 254गाड्यांवर कारवाई करण्यात आली आहे. त्याच्या पाठोपाठ पूर्व मुंबईत 165 गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. दक्षिण मुंबईत95 , मध्य मुंबई 109 व पश्चिम मुंबईत86 गाड्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा