वडाळा पोलिस ठाण्यातील 9 पोलिसांना कोरोनाची बाधा


वडाळा पोलिस ठाण्यातील 9 पोलिसांना कोरोनाची बाधा
SHARES
वाकोला पोलिस ठाण्यात 6 जणांना कोरोनाची बाधा झाल्याची घटना ताजी असतानाच मुंबईच्या वडाळा पोलिस ठाण्यातील 9 जणांना कोरोना झाल्याचे उघडकीस आले आहे. या  9जणांचे रिपोर्ट पाँझीटिव्ह आल्याने त्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. या पोलिस ठाण्यातील 26 कर्मचाऱ्यांची प्रतिबंधात्मक उपाय म्हणून कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यात सात जणांना कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्याच्या संपर्कातील इतर दोन कर्मचाऱ्यांची त्यात भर पडल्याने हा आकडा 9 वर गेला आहे.

वडाळा पोलिसांच्या हद्दीत सात रेड झोन आहेत. मीठ आगार, बंगालीपुरा, संगमनगर, बीपीटी सारख्या झोपडपट्टी परिसराचाही समावेश आहे. मीठ आगार व परिसरात 12 कोरोना संशयीत रुग्ण सापडले आहेत. कोरोनाची लागण झालेले पोलिसांपैकी  काही जण या परिसरातही बंदोबस्तासाठी तैनात होते. पोलिस या परिसरात सध्या बंदोबस्तासोबत नागरीकांना जेवण वाटपही करत आहेत. आपले कर्तव्य बजावत असताना हे पोलिस कोरोना बाधीत व्यक्तीच्या संपर्कात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या कर्मचाऱ्यांवर वांद्रे येथील गुरू नानक रुग्णालय, परळ येथील केईएम रुग्णालय व मरीन लाईन्स येथील बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यातील काहींचे वय 50 पेक्षा अधिक असल्याचे दुस-या अधिका-याने सांगितले. त्यांच्या संपर्कातील इतर व्यक्तींचे विलगीकरण करण्यात आले आहे.

 त्यातील काहींना कोरोनासारखी लक्षण वाटत असल्यामुळे 27 एप्रिलला 26 पोलिसांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यातील सात जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. वडाळा पोलिस ठाण्यातील एकूण 9 पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यात पोलिस शिपाई, पोलिस नाईक व हवालदार दर्जाच्या पोलिसांचा समावेश आहे.  जेवण करताना हे कर्मचारी एकञ बसत असल्याने त्यांना ही बाधा झाल्याचे लक्षात आल्यानंतर  इतर पोलिस ठाण्यातील वरिष्ठांनी पोलिस कर्मचाऱ्यांना एकञ डब्बा खाण्यास मनाई केल्याचे कळते.
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा