झोपाळ्यावर खेळताना ८ वर्षीय मुलाचा गळफास लागून मृत्यू

मुंबईच्या अंधेरी परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे.

झोपाळ्यावर खेळताना ८ वर्षीय मुलाचा गळफास लागून मृत्यू
SHARES

एका ८ वर्षांच्या मुलाचा झोपाळ्यावर खेळताना घळफास लागून मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. मुंबईच्या अंधेरी परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. इस्माइल आघा असं मृत मुलाचं नाव असून, शनिवारी ही घटना घडली. याप्रकरणी डी. एन. नगर पोलिस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली.

अंधेरीच्या कामा रोड परिसरात गावदेवी डोंगर इथं दुमजली घरामध्ये आघा कुटुंबीय राहतात. मोठे कुटुंब असल्यानं त्यांनी घरामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये राहण्यासाठी विभागणी केली आहे. इस्माइल हा आई-वडील आणि ३ भावंडांसह सर्वांत वरील मजल्यावर राहत होता. शनिवारी संध्याकाळी ५ वाजताच्या सुमारास इस्माइलचे वडील कामानिमित्त बाहेर गेले होते आणि आई झोपली होती.

इतर भावंडे पहिल्या आणि तळमजल्यावर खेळत होती. याचदरम्यान इस्माइल घरात बांधलेल्या झोपाळ्यावर बसला होता. काही वेळानं त्याची बहीण वर आली त्यावेळी झोपळ्याच्या दोऱ्यांमध्ये इस्माइलचा गळा आवळल्याचं तिनं पाहिलं. त्यानंतर इस्माइलच्या आईनं घरातील इतर सदस्यांना बोलावून त्याच्या गळ्याभोवती बसलेला फास सोडवला.

यानंतर तातडीनं इस्माइलला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र दाखल करण्यापूर्वीच त्याला मृत घोषित करण्यात आलं. 

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा