अंगावर झाड पडून ९ वर्षाच्या मुलाचा मृत्यू

या प्रकरणी ना.म.जोशी मार्ग पोलिस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

अंगावर झाड पडून ९ वर्षाच्या मुलाचा मृत्यू
SHARES

मुंबईतल्या ना.म.जोशी मार्ग परिसरात अंगावर झाड कोसळून ९ वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना ४ आॅगस्ट रोजी दुपारी घडली. या दुर्घटनेत समर दिनेश बोसक या ९ वर्षाच्या तरुणाचा मृत्यू झाल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे. या प्रकरणी ना.म.जोशी मार्ग पोलिस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचाः- कोरोनामुक्त झालेल्या रुग्णाला पुन्हा COVIDचा संसर्ग, मुंबईतील पहिलीच केस

ना.म.जोशी मार्गावरील मारवाडी चाळ परिसरात समर हा त्याच्या कुटुंबियांसोबत रहात होता.  दुपारी तो त्या झाडाखालून जात असताना. अचानक ते झाड त्याच्यावर कोसळले. त्यावेळी स्थानिकांनी त्याला वाचवण्यासाठी मदतकार्य सुरू केली. तर एकाने पोलिस नियंत्रण कक्षाला फोन करून घटनेची माहिती दिली. पोलिस नि यंत्रण कक्षातून पालिका वार्ड अधिकाऱ्यांना कळवतं मदत पाठवली. जखमी समरला उपचारासाठी तातडीने वाडिया रुग्णालयात नेहण्यात आले. मात्र समरचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी घोषीत केले. या प्रकरणी ना.म.जोशी मार्ग पोलिस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा