गुंतवणूकीवर दुप्पट आमीष दाखवून शेकडोंना कोट्यवधी रुपयांचा गंडा


गुंतवणूकीवर दुप्पट आमीष दाखवून शेकडोंना कोट्यवधी रुपयांचा गंडा
SHARES

नागरिकांना गुंतवणूकीवर दहा टक्के व्याज देण्याचे आमीष दाखवून शेकडो मुंबईकरांना गंडा घालणाऱ्या एका कंपनीचा सीईओ आणि उपाध्यक्षाला साकीनाका पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे पोलिसात हे प्रकरण गेल्याचे कळताच कंपनीकडून तब्बल १४०० खात्यांमध्ये ३० कोटी रुपये वळवण्यात आले आहेत. त्यामुळे या प्रकरणात सहभाग असणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पश्चिम प्रादेशिक विभागाचे अप्पर पोलिस आयुक्त डाॅ. मनोजकुमार शर्मा यांनी दिली.


१२०० जणांची गुंतवणूक हडप

साकीनाका जंक्शन येथील सागर टेक प्लाझा येथे क्यूरकी टेक्नाॅलाॅजी प्रायव्हेट लिमिटेड या नावाने नवीन कंपनी स्थापन करून गुंतवणूक करणाऱ्यांना १० टक्के व्याजानं परतावा मिळेल, असं आमीष दाखवण्यात अालं. नागरिकांना आकर्षित करण्यासाठी गलेलठ्ठ पगाराची नोकरी देऊन तरुणांना कामावर ठेवलं. त्यानुसार वेगवेगळ्या स्किममध्ये अवघ्या सहा महिन्यात कंपनीत १२०० गुंतवणूकदारांनी पैसे गुंतवले. सुरुवातीला काही महिने नागरिकांना नियमित पैसे मिळाले. मात्र जुलै २०१८ नंतर पैसे थकल्यानंतर फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांनी साकीनाका पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली.


३० कोटी रुपयांचा व्यवहार

या प्रकरणाची गंभीर दखल घेत साकीनाका पोलिसांनी कंपनीचे सीईओ आणि व्हाइस प्रेसिडेन्ट यांना तातडीने अटक केली. कारवाई होणार याबाबतची माहिती मिळताच आरोपींकडून तब्बल कोटक महिंद्रा बॅकेतील ३० कोटी रुपयांचा व्यवहार केला. हे पैसे १४०० जणांच्या खात्यांवर वळवले. पोलिसांनी कंपनीचे कार्यालय सील केले असून कंपनीचा व्यवहार चालत असलेली सहा खाते ही पोलिसांनी गोठवली आहेत.



संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा