महिलेची बॅग चोरणारा पोलिसांच्या तावडीत

महिलेची बॅग चोरणाऱ्या आरोपीला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकातील पोलिसांनी अटक केली आहे. मुकद्दर मुमताजअली इद्रसी उर्फ रेहमा (२४) असं या आरोपीचं नाव असून प्रतिभा विजयकुमार त्रिपाटी (५८) यांची बॅग चोरली होती. याप्रकरणी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकातील पोलिसांनी मुकंद्दर याला रविवारी जे. जे. रुग्णालयाबाहेरील परिसरातून अटक केली आहे.

महिलेची बॅग चोरणारा पोलिसांच्या तावडीत
SHARES

मुंबईतील मध्य रेल्वेच्या मस्जिद बंदर ते सॅन्डहर्स्ट रोड स्थानकादरम्यान महिलेची बॅग चोरणाऱ्या आरोपीला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकातील पोलिसांनी अटक केली आहे. मुकद्दर मुमताजअली इद्रसी उर्फ रेहमा (२४) असं या आरोपीचं नाव असून प्रतिभा विजयकुमार त्रिपाटी (५८) यांची बॅग चोरली होती.

याप्रकरणी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकातील पोलिसांनी मुकंद्दर याला रविवारी जे. जे. रुग्णालयाबाहेरील परिसरातून अटक केली आहे.


नेमकं प्रकरण काय?

प्रतिभा त्रिपाटी या अंधेरीतील एस. एस. नगर अंबोली इथं राहणाऱ्या असून २२ ऑगस्ट रोजी सकाळी ८.१० वाजेच्या सुमारास बंगळुरूला जाण्यासाठी सीएसटीएम स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक १७ वरून उद्यान एक्स्प्रेस पकडली होती. त्यावेळी ही एक्स्प्रेस सुटताच मुकद्दरनं ८.१५ च्या सुमारास मस्जिद बंदर ते सॅन्डहर्स्ट रोड स्थानकादरम्यान एक्स्प्रेसमध्ये चढला आणि प्रतिभा यांची पर्स खेचून एक्स्प्रेसमधून पळ काढण्याचा प्रयत्न केला होता. 


मात्र, प्रतिभा यांनी त्यांची पर्स घट्ट पकडली असल्यानं त्यानं प्रतिभा यांची पर्स खेचत त्यांना बोगीच्या दरवाज्याजवळ आणलं आणि जोरात पर्स खेचली. यामुळं प्रतिभा दरवाजातून खाली पडल्या असता त्यांच्या डोक्याला आणि हाताला दुखापत झाली होती.


अखेर चोरटा जेरबंद

या प्रकरणी तपास सुरू असताना रविवारी एका खबऱ्यानं पोलिसांना मुकद्दर हा जे.जे. रुग्णालयाच्या गेट नंबर ६ च्या बाहेरील परिसरात झोपला असून त्याच्याकडे त्या महिलेची पर्स सापडली आहे. खबऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी रविवारी संध्याकाळच्या सुमारास मुकद्दर याला अटक केली. तसंच प्रतिभा यांचा चोरलेला मोबाईल आणि पर्स जप्त केला.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा