४ रुपयांसाठी नालासोपाऱ्यात एकाची हत्या


४ रुपयांसाठी नालासोपाऱ्यात एकाची हत्या
SHARES

फक्त चार रुपयांसाठी एका इसमाला आपला प्राण गमवावा लागला आहे. ही दुर्दैवी घटना नालासोपारा इथली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून दोघांना ताब्यात घेतलं आहे.

गोरखनाथ उर्फ रवी भागवत (४൦) हा पालिकेचा कर्मचारी असून तो विरारच्या डोंगरपाडा इथला रहिवासी आहे. शनिवारी रात्री रवी तुळींज पोलीस ठाण्यासमोरील एका हातगाडीवर आमलेट-पाव खाण्यासाठी गेला होता. आमलेट-पाव खाल्ल्याचं त्याचं बिल २४ रुपये झालं. पण रवीकडे फक्त २൦ रुपये होते, जे त्यानं विक्रेत्याला दिले. उर्वरित चार रुपयांवरून भागवत आणि राजू यांच्यात वाद जाला. वादाचं रुपांतर हाणामारीत झालं. यात राजूच्या दोघा साथीदारांनी रवीवर चाकूनं हल्ला केला. रवीला जखमी अवस्थेत शताब्दी रुग्णालयात दाखल केलं गेलं. मात्र, रविवारी संध्याकाळी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

रवीच्या कुटुंबीयांनी तुळींज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मात्र, दखलपात्र गुन्हा असूनही पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा नोंदवला. गुन्हा दाखल करण्यात हलगर्जी केल्या प्रकरणी दोन पोलीस उपनिरीक्षकांसह अन्य एका एका पोलिसाला निलंबित करण्यात आलं आहे. तसंच त्यांच्या चौकशीचे आदेश देखील देण्यात आले आहेत.

रविवारी या प्रकरणात हत्येचा गुन्हा दाखल करत आरोपी विक्रेता राजू आणि त्याचा साथीदार महेश याला अटक केली आहे.



हेही वाचा

लोकल विनयभंग प्रकरणाचा अहवाल सादर करा, महिला आयोगाचे रेल्वे पोलिसांना आदेश

छेडछाडीच्या भितीने ‘तिने’ धावत्या लोकलमधून मारली उडी, आरोपीचा शोध सुरू


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा