छेडछाडीच्या भितीने ‘तिने’ धावत्या लोकलमधून मारली उडी, आरोपीचा शोध सुरू

मुंबईत महिला प्रवाशांच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या दोन घटना उघडकीस आल्याने मुंबईकरांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.

छेडछाडीच्या भितीने ‘तिने’ धावत्या लोकलमधून मारली उडी, आरोपीचा शोध सुरू
SHARES

छेडछाडीचा प्रयत्न करणाऱ्या ३० ते ३५ वर्षांच्या व्यक्तीला घाबरून एका १४ वर्षांच्या विद्यार्थीनीने रविवारी सकाळी धावत्या लोकलमधून उडी मारल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या विद्यार्थीनीच्या पायाला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली असून सध्या या विद्यार्थीनीवर सेंट जॅर्ज रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या विद्यार्थीनीचं नाव पायल कांबळे असं आहे.


काय आहे प्रकरण?

परळला क्लासला जाण्यासाठी पायलने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून रविवारी सकाळी ९.२९ वाजेची कल्याण धिमी लोकल पकडली. सुट्टीचा दिवस असल्याने महिलांसाठी राखीव असलेल्या डब्यात तिच्याशिवाय इतर कुणीही नव्हतं, त्याचवेळेस या डब्यात ३० ते ३५ वर्षांचा एक अज्ञात इसम चढला.


'अशी' मारली उडी

डब्यात इतर कुणीही नसल्यानं पायलने त्याला डब्यातून खाली उतरण्यास सांगितलं. पण त्याने तिचं न ऐकता उलट तिलाच धाक दाखवून शांत बसण्यास सांगितलं. घाबरलेल्या पायलनं आपत्कालीन साखळी खेचून लोकल थांबवण्याचा प्रयत्न केल्यावर तो तिच्या अंगावरही धावून गेला. तेव्हा धीर एकवटून पायलने थेट लोकलच्या दरवाज्याजवळ धाव घेतली.


गँगमन्स धावले मदतीला

तोपर्यंत लोकलने वेग घेतलेला नव्हता. तिला ट्रॅकवर काही गँगमनही काम करताना दिसले. हे पाहून तिने थेट लोकलमधून खाली उडी घेतली. ट्रॅकवर काम करत असलेले गँगमन्स तिच्या मदतीसाठी धावले. त्यांनी तात्काळ या पायलला उचलून सीएसएमटी स्थानकावरील प्लॅटफॅर्म क्र. ८ वर आणलं आणि तिथून तिला सेंट जॅर्ज रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं.


आरोपीचा शोध सुरूच

आरोपी मस्जिद बंदर स्थानकात उतरल्याचा संशय असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. आरोपी पायलचा फोन किंवा दागिने चोरण्याच्या हेतूनेही तिच्या जवळ जात असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.



हेही वाचा -

धावत्या लोकलमध्ये अश्लील चाळे करणाऱ्याला अटक


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा