धावत्या लोकलमध्ये अश्लील चाळे करणाऱ्याला अटक


धावत्या लोकलमध्ये अश्लील चाळे करणाऱ्याला अटक
SHARES

धावत्या लोकल ट्रेनमध्ये २३ वर्षीय तरुणीसमोर अश्लील चाळे करणाऱ्या कृपा पटेल (३०) नावाच्या विकृताला जीआरपीने अटक केली आहे. तक्रारदार तरूणीने या विकृताचा अश्लील चाळे करतानाचा व्हिडीओ काढून तो जीआरपीला दिल्यानंतर जीआरपीने तपास करून पटेलला अटक केली.

काय आहे प्रकरण?

पीडित तरूणीने शनिवारी सकाळी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरुन गाडी पकडली. गाडी सुटताच महिलांच्या समोरील अपंगांच्या डब्यातील एका विकृत व्यक्ती पीडित तरूणीकडे बघून अश्लील चाळे करायला लागला. पीडित तरूणी सुरूवातीला घाबरली; पण तिने धीर न सोडता त्या विकृत इसमाचा व्हिडीओ काढला. एवढ्यावरच न थांबता मस्जिद बंदर स्थानकात उतरून तिने हा व्हिडीओ पोलिसांच्या स्वाधीन केला आणि त्याच्याविरोधात तक्रारही दाखल केली.


'अशी' झाली अटक

तक्रार दाखल होताच आम्ही तपासाला सुरूवात केली. सीएसटीएम स्थानकातील सीसीटीव्ही फुटेज आम्ही तपासले मस्जिद रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही देखील तपासले. त्यानंतर हा इसम सीएसटीएम स्थानकात फिरत असल्याची माहिती आम्हाला मिळाली. त्यानुसार सोमवारी सकाळी आम्ही सीएसटीएम स्थानकाच्या गेटसमोरून आरोपीला अटक केल्याची माहिती सीएसटीएम जीआरपीचे पोलीस निरीक्षक विलास चौगुले यांनी दिली.

कृपा पटेलला सोमवारी आरोपीला कोर्टात हजर करण्यात आल्यावर कोर्टाने त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे.


Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा