'त्या' दोन नराधमांना अटक


'त्या' दोन नराधमांना अटक
SHARES

भांडुप - रात्रीच्या वेळी केमिस्टच्या दुकानात औषधं आणण्यासाठी गेलेल्या १० वर्षाच्या मुलीला उचलून रिक्षामध्ये नेत दोन नराधमांनी तिच्याशी अश्लिल चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. याप्रकरणी गुन्हा दाखल करून भांडुप पोलिसांनी दोन्ही नराधमांना बेड्या ठोकल्यात.
भांडुप पश्चिम परिसरात कुटुंबियांसोबत राहणारी 10 वर्षाची मुलगी शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमारास औषधं आणण्यासाठी केमिस्टच्या दुकानात गेली होती. रस्त्यावरील काळोखाचा फायदा उचलत अहमद रजाक शेख (21) आणि अब्दुल रशिद मजिद शेख (36) या दोन नराधमांनी तिला उचलून रस्त्याच्या कडेला ऊभ्या असलेल्या रिक्षामध्ये नेले. तेथे दोन्ही नराधमांनी तिच्याशी अश्लिल चाळे करण्यास सुरुवात केली. मात्र मुलीनं प्रसंगावधान दाखवत नराधमांच्या तावडीतून सुटका करून घेत घर गाठले. आपल्यासोबत घडलेला प्रकार घरच्यांना सांगताच पीडित मुलीच्या आईने भांडुप पोलीस ठाण्यात धाव घेत याप्रकरणी तक्रार नोंदवली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीपाद काळे यांनी याप्रकरणी तात्काळ गुन्हा दाखल करून आरोपींना पकडण्यासाठी पोलीस पथक रवाना केले. पोलिसांनी या परिसरातील स्थानिकांकडे चैकशी केल्यानंतर दोन्ही नराधम विक्रोळीच्या टागोरनगर परिसरातील असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार शनिवारी पहाटे दोन्ही आरोपींना राहत्या घरातून अटक करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितले

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा