बकरा बांधण्यावरुन झालेल्या वादात चाकूने वार

  Govandi
  बकरा बांधण्यावरुन झालेल्या वादात चाकूने वार
  मुंबई  -  

  घराबाहेर बकरा बांधण्यावरून झालेल्या वादात शेजाऱ्यानेच शेजाऱ्यावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना मंगळवारी रात्री गोवंडीतील म्हाडा वसाहतीत घडली. या हल्ल्यात वाजिदअली निसार अहमद अन्सारी (36) हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सायन रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. याबाबत शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करत बिलाल शेख (27) याला अटक केली आहे. 

  आरोपी आणि फिर्यादी हे दोघेही गोवंडी शिवाजीनगरमधील म्हाडा वसाहतीतील इमारत क्रमांक 12 मध्ये राहतात. वाजिदने घराबाहेर बकरा बांधल्याने या दोघांमध्ये अनेकदा वाद झाले होते. मंगळवारी रात्री तर, या वादाचे रुपांतर हाणामारीत झाल्याने संतापलेल्या बिलालने घरातील चाकूने वाजिदवर वार केले. यामध्ये तो गंभीर जखमी झाला आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.